Gaur Gopal Das: उपवास कोणता करायचा, भाषा कोणती बोलायची, गौर गोपाल दास यांचे मंत्रालयात बेधडक सल्ले!
Gaur Gopal Das: प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी, प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी "टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक' मंत्रालयात साजरा करण्यात येत आहे. यावेळी गौर गोपाल दास यांनी मंत्रालयात बेधडक सल्ले दिलेत.

मुंबई: महाराष्ट्र शासनाकडून पहिल्यांदाच ‘टेक वारी’चे आयोजन करण्यात आले आहे. या टेक वारीमध्ये गौर गोपाल दास यांनी प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांना मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना त्यांनी भाषेचा अनुवाद हा किती बदलत जातो याचे उदाहरण दिले आहे. भाषा कुठली बोलायची यापेक्षा आपला मुद्दा पोहचणे गरजेचं आहे. भाषा ही महत्त्वाची असतेच, आपल्याला मराठीचा गर्व असलाच पाहिजे. पण,, मराठी बोलता बोलता जर आपला मुद्दाच पोहचलाच नाही तर मराठीचे काय लोणचे घालायचे? असं त्यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, तुम्ही उपवास केला आहे का? आज जर उपवास करायचा असेल तर अन्नापासून नाही तर मोबाईल आणि समाज माध्यमाचा उपवास करणे गरजेचं आहे. जर तुम्ही हे केले तर देव साक्षात खाली येईल आणि बोलेल आता काय रडवतो का? असंही ते पुढे म्हणालेत.
मेंदू ॲक्टिव ठेवला पाहिजे
आता प्रेमाची भाषा टेक्नोलॉजीने बदलली आहे. आपण टेक सेवी झालो आहे. तांत्रिक प्रगती आपण केलेली आहे. आपण टेक्नॉलॉजीला अडॉप्ट केले आहे. आपण वैयक्तिक जीवनात टेक्नोलॉजीचा वापर करत आहोत, पण आपल्या कामात आपण टेक सेव्ह झालो आहे का? आपल्या कामात हे करणे गरजेचं आहे, म्हणून आपण आयुष्यभर विद्यार्थी असलो पाहिजो. आपल्याला अल्जाइमर नाही झाला पाहिजे म्हणून आपण मेंदू ॲक्टिव ठेवला पाहिजे. शिकत राहा, नेहमी विद्यार्थी रहा. आपल्याकडील संधीचा लाभ घ्यायला हवा. घारीच वय 70 वर्ष आहे पण 40 झालं की तिच्या पंखातलं बळ कमी होतं, मासा पकडणारी चोच कमकुवत होती, नखांना धार राहत नाही. जर नवीन टेकला अपडेट केले नाही तर मरून जाल. त्रास नाही तर आयुष्य नाही. घार डोंगरावर जाऊन सगळे जुने पंख नखे काढून टाकते.दोन-तीन महिन्यांनी सगळं नवं येतं त्यानंतर ही घार उंच भरारी घेण्यासाठी तयार असते, असं म्हणत त्यांनी नेहमी काही ना काही शिकत राहण्याचं आवाहन यावेळी दिलं आहे. मंत्रालयात यावेळी मंत्र पठण देखील करण्यात आलं आहे. ओम् इग्नोराय नम: हा मंत्र आरोग्य डिजिटल सेवी होण्यसाठी वापरायचा आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
गौर गोपाल दास यांनी सांगितला टेक वारीचा अर्थ
टेक वारीतला हा पहिला शब्द टेक हा आहे, तर घाबरू नका, भरपूर संधी आहे. 100 दिवसात 5 लाख कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे. आपण मराठी महाराष्ट्रीयन शिकण्यासाठी किती उत्साही आहोत. पंढरपुरात मंदिरात विठ्ठल उभा आहे, महाराष्ट्रातून सगळे चालत. जातात राम कृष्ण हरी म्हणत. काही जण हेलिकॉप्टरने जातात म्हणजे उपमुख्यमंत्री, आपल्या मंत्रालयात ही विठ्ठल आहे आणि तो आहे तंत्रज्ञान आणि आपल्याला त्याकडे चालत जायचे आहे. या मंदिराचा अभंग आहे AI ब्लॉक चेन साइबर सिक्योरिटी म्हणून वारी हा शब्द महत्त्वाचा आहे. जेन झी आला आहे, तुमची नोकरी खाऊन टाकतील. मराठी मधला ‘ळ’ गेला तर होळी नाही, पोळी नाही, मिसळ नाही, काही नाही, मराठीचा अभिमान आहे ‘ळ’, असंही पुढे गौर गोपाल दास यांनी म्हटलं आहे.
काय आहे टेक वारी?
प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी, प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी "टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक' आजपासून दि. 5 ते 9 मे दरम्यान मंत्रालयात साजरा करण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता(AI), ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा, कार्यशाळा व विचारमंथनाच्या प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती आहे. ‘टेक वारी’ म्हणजे महाराष्ट्र शासन आयोजित पहिली डिजिटल वारी होय. आधुनिक तंत्रज्ञान व नवीन कल्पनांचा संगम असून ‘टेक वारी’ ही मंत्रालयातून सुरू होऊन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यात तंत्रज्ञानाचा प्रसार करुन त्यामधून आधुनिक तंत्रस्नेही महाराष्ट्र घडविण्याची सुरुवात आहे. या ‘टेक वारी’ मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा इत्यादी तंत्रज्ञानाबाबत सत्रे तसेच तणाव व्यवस्थापन, आरोग्यदायी जीवनशैली, ध्यानधारणा याबाबतच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. हे सर्व कार्यक्रम टेक वारीच्या पहिल्या दिवशी दि. 5 मे रोजी मंत्रालयातील त्रिमुर्ती येथे ‘प्रभावी व तणावमुक्त जीवन’ या विषयावर प्रभु गौर गोपाल दास मार्गदर्शन करत आहेत.
























