Mohit Kamboj: मोहित कंबोज हा कोणाच्या चड्डीचा नाडा हे सगळ्यांना माहीत; मिटकरींचा हल्लाबोल
Maharashtra Politics : मोहित कंबोज हे भाजपचा भोंगा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.मोहित कंबोज यांना तपास यंत्रणांच्या कारवाईची माहिती कशी मिळते याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
Maharashtra Politics : भाजप नेता मोहित कंबोज यांनी केलेल्या सूचक ट्वीटचे (Mohit Kamboj) राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. मोहित कंबोज हा कोणाच्या चड्डीचा नाडा आहे, हे सगळ्यांना माहीत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी म्हटले. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर राष्ट्रवादीचा आणखी एक नेता तुरुंगात जाणार असल्याचे ट्वीट कंबोज यांनी केले होते.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची आजपासून सुरुवात झाली आहे. त्याआधीच मोहित कंबोज यांनी केलेल्या सूचक ट्वीटची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कंबोज यांच्यावर जोरदार टीका केली. मिटकरी यांनी म्हटले की, मोहित कंबोज हा भाजपचा भोंगा आहे. हा भोंगा जनतेच्या प्रश्नावर, स्त्री अत्याचारावर, जीएसटी आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कधीही वाजत नाही, अशी टीका मिटकरींनी दिली. मोहित कंबोज हा 'लष्कर-ए-देवेंद्र' मधील तिसऱ्या फळीतील नेता असल्याचेही मिटकरींनी म्हटले.
कंबोज यांची चौकशी करा; मिटकरींची मागणी
मोहित कंबोज यांना बोलण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यांना माहिती कोण देतंय याची चौकशी करणे गरजेचे आहे. ईडी कार्यालयात कंबोज बसत असतील त्यांची चौकशी करावी अशी मागणी मिटकरी यांनी केली. मोहित कंबोज यांना ईडीसह इतर तपास यंत्रणांच्या कारवाईची माहिती कशी मिळते याची चौकशी करावी अशी मागणीदेखील मिटकरी यांनी केली.
मोहित कंबोज यांचे ट्वीट काय?
मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) हे दोन मोठे नेते तुरुंगात आहेत. त्याच आता भाजपचे (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केलेल्या ट्वीटमुळे खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठ नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना भेटणार आहे, असं मोहित कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोघेही सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेमक्या कोणत्या नेत्याकडे मोहित कंबोज यांनी इशारा केला आहे, असा प्रश्न या ट्वीटनंतर उपस्थित झाला आहे.
सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी करा
मोहित कंबोज यांनी मंगळवारी रात्री उशिरा तीन ट्वीट केले आहेत. त्यापैकी दुसऱ्या ट्वीटमध्ये "2019 साली परमबीर सिंह यांच्या काळात बंद करण्यात आलेल्या सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी झाली पाहिजे," असा उल्लेख आहे. सिंचन घोटाळ्यात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं नाव आलं होतं. 2019 साली लाचलुचपत प्रतिबंध विभागाने अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट दिली होती. ACB ने 19 डिसेंबर 2019 रोजी हायकोर्टात सादर केलेल्या शपथपत्रात अजित पवार यांना क्लीन चिट दिल्याचं स्पष्ट केलं होता. तत्कालीन ACB चे महासंचालक परमबीर सिंह यांनी कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात, "या चौकशीत/तपासात प्रतिवादी क्रमांक 7 (अजित पवार) विरोधात गुन्हेगारी स्वरुपाचं उत्तरदायित्व आढळलं नाही."