एक्स्प्लोर

नाव बदलणाऱ्यांकडून महाराष्ट्राच्या तिजोरीत 5 कोटींची भर

जगप्रसिद्ध इंग्रजी लेखक आणि कवी विलियम शेक्सपियरने म्हटलं होतं. नावात काय आहे? परंतु नावातच सगळं काही असतं, ही बाब अधोरेखित करणारी काही आकडेवारी समोर आली आहे.

मुंबई : जगप्रसिद्ध इंग्रजी लेखक आणि कवी विलियम शेक्सपियरने म्हटलं होतं. नावात काय आहे? परंतु नावातच सगळं काही असतं, ही बाब अधोरेखित करणारी काही आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रातील नावात बदल करणाऱ्या नागरिकांनी राज्याच्या तिजोरीत 5 कोटी रुपयांची भर टाकली आहे. मुंबईसह राज्यातील नाव बदलणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्य सरकारकडून नावात बदल करणाऱ्यांकडून 523 रुपये शुल्क आकारले जाते. नावात बदल करणाऱ्यांची संख्या इतकी आहे की, या लोकांकडून शुल्काच्या रुपात आतापर्यंत 5 कोटी रुपये आकारले आहेत. एप्रिल 2018 ते जून 2019 पर्यंत महाराष्ट्रात तब्बल 1 लाख लोकांनी त्यांच्या नावात बदल केला आहे, अथवा नाव बदललं आहे. नावात बदल करण्यामागची विविध कारणे लोकांनी दिली आहेत. त्यामध्ये लग्नानंतर पतीचं आडनाव लावणे, घटस्फोट झाल्यानंतर नाव बदलणे, धर्म परिवर्तन करणे, पुनर्विवाह करणे, दत्तक घेणे, सरकारी ओळखपत्रांवरी नावातील स्पेलिंग बदलणे, नशीब बदलण्यासाठी ज्योतिषांनी सुचवलेले बदल करणे अशा अनेक कारणांमुळे अनेक लोक त्यांचं नाव बदलतात किंवा नावात काही बदल करतात. नावात बदल करण्याची पूर्वीची प्रक्रिया खूपच अवघड आणि खूप जास्त वेळ घेणारी आहे. परंतु 2014 साली सरकारने ही प्रक्रिया ऑनलाईन केली. नव्या ऑनलाईन प्रक्रियेद्वारे आतापर्यंत राज्यात 6 लाख लोकांनी नावात बदल केले आहेत. पूर्वी नावात बदल करण्यासाठी 125 रुपये शुल्क भरावे लागत होते. आता याच कामासाठी 523 रुपये आकारले जातात. मागसवर्गीय, अनुसूचित जाती आणि जमातींमधील लोकांकडून याच कामासाठी 270 रुपये आकारले जातात. नावात बदल करुन लोकांच्या नशीबात बदल होवो न होवो, परंतु राज्याच्या तिजोरीत मात्र भर पडत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मुंबईकरांनो सावधान! वातावरणात मोठा बदल, तापमानाचा पारा 38 अंशाच्या पुढे, हवामान विभागानं दिला इशारा
मुंबईकरांनो सावधान! वातावरणात मोठा बदल, तापमानाचा पारा 38 अंशाच्या पुढे, हवामान विभागानं दिला इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये

Embed widget