Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
Israel : गादी आइसेनकोट यांना अरब पक्षांनी पाठिंबा दिल्यानं इस्त्रायलमधील बेंजामिन नेतन्याहू यांना सत्तेतून पायऊतार व्हावं लागणार असल्याचं स्पष्ट झालंय.

Israel : इस्त्रायलमध्ये अरब पक्षांच्या आघाडीनं आणि अरब नेतृत्व असलेल्या राआम पक्षानं देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून यशार पार्टीचे गादी आइसेनकोट यांना पाठिंबा दिला आहे. द टाइम्स ऑफ इस्त्रायलच्या रिपोर्टनुसार अरब पक्षांच्या जॉईंट लिस्टनं आइसेनकोट यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली. सरकार स्थापनेसाठी होणाऱ्या चर्चेत राष्ट्रपती इसाक हर्जोग यांच्यासमोर अधिकृतपणे पाठिंबा देत आइसेनकोट यांच्या नावाची शिफारस करतील. राआम पार्टीच्या 8 खासदारांनी यापूर्वीच आइसेनकोट यांना पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं होतं. आईसेनकोट यांनी मॅजिक फिगर गाठल्यानं बेंजामिन नेतन्याहू यांना सत्ता सोडावी लागणार असल्याचं चित्र निर्माण होत आहे.
राष्ट्रपतींकडून नव्या सरकारच्या स्थापनेची शिफारस शक्य
AFP च्या रिपोर्टनुसार, पार्टीनं एक प्रसिद्धीपत्रक जारी करुन गुरुवारी म्हणजेच 5 नोव्हेंबरला राष्ट्रपती इसाक हर्जोग यांना त्यांच्या निर्णयाबाबत कळवणार असल्याचं म्हटलं. नवं सरकार स्थापन करण्याची जबाबदारी गादी आइसेनकोट यांना द्याव अशी शिफारस राष्ट्रपती करणार असल्याचं जॉईंट लिस्टनं म्हटलं. आइसेनकोट यांच्याकडे 120 सदस्यांच्या संसदेत 67 सदस्यांचा पाठिंबा मिळण्याची आशा आहे. अरब पक्षांच्या पाठिंब्यानं त्यांनी बहुमताची मॅजिक फिगर पार केली आहे. त्यामुळं बेंजामिन नेतन्याहू यांना सत्ता सोडावी लागू शकते. आइसेनकोट यांच्या लिकुड पार्टी आघाडीकडे 58 जागा आहेत. यामध्ये अरबांच्या नेतृत्त्वातील राआम पार्टीच्या 8 खासदारांचा आणि जॉईंट लिस्टच्या 11 खासदारांचा समावेश आहे. अरबांच्या नेतृत्त्वातील पक्षांनी 19 जागा जिंकल्या होत्या.
आइसेनकोट यांची भूमिका काय?
आइसेनकोट यांनी त्यांच्या सरकारमध्ये अरब पक्षांना सामावून घेण्याबाबत म्हटलं होतं. 26 सप्टेंबरला चॅनेल 12 ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी राआम पार्टी त्यांच्या सरकारचा भाग नसेल असं म्हटलं होतं. दुसरीकडे बेंजामिन नेतन्याहू यांना मिळणाऱ्या पाठिंब्याबाबत अनिश्चितता कायम आहे. नेतन्याहू यांच्या गटाकडे 53 जागा आहेत. मात्र, यूनायटेड जुडाइज्मच्या अंतर्गत हातोराह गटानं कोणत्याही उमेदवाराच्या नावाची शिफारस करणार नसल्याचं म्हटलं. अतिरुढीवाद गटांनी नेतन्याहू यांच्यापासून अंतर राखलं आहे.
इस्त्रायलच्या राष्ट्रपतींनी चर्चांच्या फेऱ्यांना सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी संसेच्या निवडणुकांचा निकाल स्वीकारत असल्याचं म्हटलं होतं. राजकीय पक्षांसोबत चर्चा सुरु केली असल्याचं सांगितलं होतं. हर्जोग यांनी सर्व पक्षांना आणखी एका निवडणुकीची वेळ येऊ देऊ नये यासाठी प्रयत्न करावेत असं म्हटलं होतं. हर्जोग यांनी म्हटलं की समजूतदार व्यक्ती आमच्यासमोर सध्याची सुरक्षा, राजनैतिक आव्हानं आणि आजूबाजूच्या प्रादेशिक स्थिती आणि देशाला अंतर्गत विभाजित करणाऱ्या मुद्यांबाबत विचार केल्यास नेत्यांवर किती मोठी जबाबदारी आहे हे त्यांना समजेल, असं हर्जोग म्हणाले.
हर्जोग यांनी रिलिजिअस जायोनिज्म, जेहुत, शास आणि इस्त्रायल बेतेनु पार्टीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. या पक्षांच्या शिष्टमंडळानं शिपारशी दिल्या आहेत. राष्ट्रपतींनी चर्चेच्या फेऱ्या सुरु राहतील असं देखील सांगितलं.






















