एक्स्प्लोर

युतीबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दानवे घेणार

मुंबई : शिवसेनेशी युती करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रंगलेली चर्चा अखेर संपली आहे. जवळपास चार तास चाललेल्या बैठकीनंतर युतीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून 'सामना'तून शिवसेनेकडून येणारे टीकेचे बाण किंवा भाजपला 60 जागा देण्याचा सेनेने घेतलेला निर्णय, यामुळे भाजपच्या गोटात तीव्र नाराजी असल्याची माहिती आहे. युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. युतीबाबत चर्चा करायची की नाही, याबाबतही दानवे आणि फडणवीस अंतिम निर्णय घेतील. बैठकीला मुख्यमंत्र्यांसोबत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, मनोज कोटक, गोपाळ शेट्टी, योगेश सागर, विद्या ठाकूर यासारखे भाजप आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत 227 जागांचा वॉर्डनिहाय, बुथनिहाय आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे भाजपचा जाहीरनामा, उमेदवार, पुढील रणनीतीबाबत चर्चा झाली. रात्री 9 वाजता राज्यातील पदाधिकाऱ्यांची पुन्हा बैठक होत आहे. शिवसेना आणि भाजप यांच्या युतीसंदर्भातील तिसरी बैठक शनिवारी पार पडली. पण या बैठकीत भाजपकडून देण्यात आलेला 114 जागांचा प्रस्ताव शिवसेनेनं फेटाळला. शिवसेनेकडून भाजपला 60 जागांचा प्रस्ताव देण्यात आला. त्यामुळे युतीबाबतच्या तिसऱ्या बैठकीतही तणाव कायम होता. दोन्ही पक्षांनी एकमेकांचा प्रस्ताव नाकारल्यानं युती तुटण्याची चिन्हं निर्माण झाली. नोटाबंदीच्या डेडलाईन हुकल्या, मग युतीच्या चर्चेस डेडलाईन का?, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी रविवारी दुपारी भाजपला लगावला होता. तसंच युतीबाबत अद्याप ठोस प्रस्ताव आलेला नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं. महापालिका निवडणुकीत युती करण्यासंदर्भात शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांमध्ये चर्चेच्या फेऱ्या होत आहेत. आतापर्यंत तीन बैठका पार पडल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठाम भूमिका समोर आलेली नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांची नेमकी भूमिका काय, याबाबतही जनतेच्या मनात संभ्रम आहे.

संबंधित बातमी :

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 'वर्षा'वर युतीच्या मुद्द्यावर खलबतं

…मग युतीसाठी डेडलाईन का? : उद्धव ठाकरे

शिवसेनेकडून मुंबई आणि ठाणेकरांसाठी घोषणांचा पाऊस

शिवसेनेच्या प्रस्तावानं भाजप नेते संतापले, बैठकीतच सेना नेत्यांना सुनावलं!

पाहुण्याला जेवायला ताट द्यावे, पण स्वत:चा बसायचा पाट देऊ नये: गोऱ्हे

युतीच्या तिसऱ्या बैठकीत नेमकं काय झालं?

युतीची बोलणी फिस्कटली, शिवसेनेकडून भाजपला 60 जागांचा प्रस्ताव

रामदास कदम यांची शेलार आणि सोमय्या यांच्यावर खालच्या शब्दात टीका

एबीपी माझा सर्व्हेचा निकाल: युतीबाबत मुंबईकरांना काय वाटतं

शिवसेना-भाजपची युतीसंदर्भातील तिसरी बैठक, वेळ आणि ठिकाण ठरलं!

एबीपी माझा सर्व्हे : मुंबई महापालिकेसाठी शिवसेना-भाजप युती व्हावी का?

मुंबई महापालिकेसाठी भाजपची 227 जागांसाठी 512 उमेदवारांची यादी तयार

शिवसेनेला आताच उपरती का? तावडेंचा सवाल

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget