एक्स्प्लोर
Advertisement
डावे नावापुरते, काँग्रेसने पोटनिवडणुकाच लढवाव्या : फडणवीस
कर्नाटकात भाजपचं सरकार येणार आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप बहुमताने निवडून येणार, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला
मुंबई : त्रिपुरा, नागालँड विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान, भाजपाध्यक्षांसह पूर्वोत्तरच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं. देशात 'डावे' फक्त नावाला उरले असल्याचा टोला यावेळी फडणवीसांनी लगावला.
काँग्रेसने फक्त पोटनिवडणुकाच लढवाव्यात, कारण इतर निवडणुकीत ते विजयी होऊ शकत नाहीत, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसला टोला लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पूर्वोत्तरच्या कार्यकर्त्यांचं फडणवीसांनी अभिनंदन केलं. 'आम्ही गमतीने म्हणायचो, की पूर्वोत्तरात आमचा एक तरी उमेदवार निवडून येईल का? मात्र या तिन्ही राज्यात भाजपला 49 ते 50 टक्के मतदान असल्याने अभूतपूर्व विजय मिळाला. या राज्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. आदिवासी समाजाने भाजपवर प्रचंड विश्वास दाखवला आहे.' असं फडणवीस म्हणाले.
पूर्वीच्या केंद्र सरकारने या क्षेत्राकडे दुर्लक्ष केलं. वन, खनिज संपत्ती आणि सीमा भाग असल्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची राज्यं आहेत. मोदींनी सर्वप्रथम अॅक्ट ईस्ट पॉलिसी तयार केली, त्यानुसार कामाला सुरुवात केली. एकात्मतेची भावना तयार करण्यात मोदींना यश आलं. मोदींचा विकासाचा मंत्र आणि अमित शाह यांचं कुशल संघटन कौशल्य यामुळे कार्यकर्ते जोडले गेल्याचं फडणवीस म्हणाले.
‘लेफ्ट’ भारतासाठी ‘राईट’ नाहीत : अमित शाह
एका पोटनिवडणुकीत पराभव झाल्यावर मोदींवर टीका करणाऱ्यांच्या डोळ्यात हे झणझणीत अंजन आहे. हा ट्रेलर आहे, कर्नाटकात भाजपचं सरकार येणार आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप बहुमताने निवडून येणार, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. विविध प्रकारचे भ्रम पसरवण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र जनता बॅलेटमधून उत्तर देत आहेत, असंही फडणवीस म्हणाले. देशात डावे नावाला उरले आहेत. 'Left is hardly left' अशी परिस्थिती आहे. काल या भागात लाल सूर्य मावळला आहे आणि केसरिया रंगाच्या सूर्याचा उदय झाला आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.मुंबईकर सुनील देवधर, त्रिपुरात डाव्यांचा गड उद्ध्वस्त करणारा भाजपचा नायक
पूर्वोत्तर राज्यांतील भाजपच्या विजयाचे हिरो सुनील देवधर यांचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं. गेली दोन वर्ष सुनिल देवधर यांनी त्रिपुरात संघर्ष केला. माणिक सरकारचा बुरखा फाडला. त्यांच्याविरोधात पुस्तकाच्या रुपात चार्जशीट दाखल केलं, असं म्हणत फडणवीसांनी देवधरांचं विशेष अभिनंदन केलं. नदी संवर्धन संकल्प कार्यक्रमाच्या अनुपस्थितीबाबतही मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. मी त्या कार्यक्रमाला जाणारच नव्हतो. आरोप करणारे लोक फ्रस्ट्रेटेड आहेत, अशांना काय उत्तर द्यायचं, असा प्रतिप्रश्न फडणवीसांनी विचारला.संबंधित बातम्या :
देशातील 68 टक्के जनतेवर एनडीएचं राज्य, काँग्रेसचं अस्तित्व नगण्य
ईशान्य भारतात मोदी लाट, त्रिपुरात भाजप, मेघालयमध्ये त्रिशंकू
ईशान्येकडील विजय बलिदान देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना समर्पित : मोदी
मेघालयात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचा प्रयत्न, अहमद पटेल शिलाँगला रवाना
ममता बॅनर्जींऐवजी ममता मोहनदासला टॅग, हार्दिक पटेल ट्रोल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement