एक्स्प्लोर
एमएमआरडीएच्या दोन हजार 417 सदनिकांची सोडत

मुंबई : गिरणी कामगारांसाठी आज 2 हजार 417 सदनिकांची सोडत निघणार आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे एमएमआरडीएच्या पनवेल तालुक्यातील मौजे कोनमधील घरांसाठी ही सोडत निघेल. गिरणी कामगारांसाठी 2417 सदनिकांची संगणकीय सोडत सकाळी दहा वाजता वांद्रे पश्चिममधील रंगशारदा सभागृहात काढण्यात येणार आहे. सोडतीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून म्हाडा प्रशासन सज्ज झालं आहे. एमएमआरडीएतर्फे बांधण्यात आलेल्या प्रत्येकी 160 चौरस फुटाच्या दोन सदनिका (परिस्थितीनुरुप शक्य असलेली जोडघरं) या प्रकारे प्रत्येकी एका युनिटसाठी सहा लाख रुपये आकारुन गिरणी कामगारांना वितरित करण्यात येणार आहेत. सोडत प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आलेल्या गिरणी कामगार किंवा त्यांच्या वारसांची माहिती म्हाडाच्या https://mhada.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोडतीमध्ये म्हाडाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या 1 लाख 48 हजार 711 गिरणी कामगारांच्या यादीतून 2012 च्या सोडतीमध्ये यशस्वी झालेले अर्जदार, 2012 च्या सोडतीतील यशस्वी अर्जदारांपैकी अंतिमतः अपात्र झालेल्या अर्जदारांऐवजी कार्यान्वित करण्यात आलेल्या प्रतिक्षा यादीमधील अर्जदार, तसंच म्हाडाच्या गिरणी कामगारांसाठी मे 2016 मध्ये काढण्यात आलेल्या सोडतीतील यशस्वी अर्जदार या सोडतीतून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण 1 लाख 38 हजार 986 अर्जदारांचा या सोडत प्रक्रियेत समावेश राहील.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
छत्रपती संभाजी नगर
क्राईम
राजकारण























