एक्स्प्लोर
उद्धव ठाकरेंच्या घोषणा अंमलात आल्यास मुंबई महापालिकेचं किती नुकसान?
मुंबई : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना मालमत्ताकर माफी आणि सवलतीचं आश्वासन दिलं आहे. पण ही घोषणा अंमलात आली तर मुंबई महापालिका मोठ्या आर्थिक डबघाईला सामोरी जाऊ शकते.
एकीकडे जकात बंद होत असल्याने महापालिकेला मिळणारं 7 हजार कोटींचं उत्पन्न बंद होणार आहे आणि त्यातच अशाप्रकारे मालमत्ता करात सवलत दिली तर महापालिकेला शेकडो कोटींचा फटका बसू शकतो.
उद्धव ठाकरेंची घोषणा आणि वस्तूस्थिती
उद्धव ठाकरे यांनी 500 फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी, 700 फुटांच्या घरांना मालमत्ता करात सवलत देण्याची घोषणा केली आहे.
500 चौ.फुटांच्या घरांना मालमत्ता कर नाही : उद्धव ठाकरे
मुंबई महापालिकेकडे गेल्या वर्षी 4 हजार 900 कोटींचा मालमत्ता कर वसूल झाला. यंदाच्या वर्षी महापालिकेचं उद्दीष्ट 5 हजार 400 कोटीपर्यंत कर वसूल करण्याचं आहे. उद्धव ठाकरेंच्या घोषणेनुसार 500 स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून मुक्त केल्यास महापालिकेवर 400 कोटींचा बोजा पडू शकतो. तसेच 700 फुटांपर्यंतच्या घरांना करसवलत दिली तर हा बोजा आणखी शेकडो कोटींनी वाढणार आहे.मालमत्ता करमुक्तीची घोषणा आमची : आशिष शेलार
मुंबईत सध्या 30 लाख युनिट्सपैकी 15 लाख युनिट्स हे 500 फुटांखालच्या मालमत्ता आहेत. 500 फुटांखालच्या मालमत्ता 15 लाखांच्या आसपास आहेत. महापालिकेवर कोणते आर्थिक परिणाम होणार? जकात रद्द झाल्याने महापालिकेला जकातीच्या स्वरुपात मिळणाऱ्या 7 हजार कोटींचा फटका बसणार आहे. त्यामुळे जकात, मालमत्ता करमाफी आणि सलवतींनंतर महापालिकेच्या उत्पन्नाचं संतुलन ठेवण्यासाठी साधारण साडे 7 हजार कोटींच्या आसपास पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. करमाफीचा बोजा कोणावर? उद्धव ठाकरे यांनी 500 फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी, 700 फुटांच्या घरांना मालमत्ता करात सवलत देण्याची घोषणा केली आहे. मात्र याचा बोजा मोठी मालमत्ता असणाऱ्यांवर पडू शकतो. व्यावसायिक, 500 फुटांपेक्षा जास्त मालमत्ताधारक आणि मोठ्या प्रकल्पांना या निर्णयाचा फटका बसू शकतो.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement