एक्स्प्लोर
राजकारणात येणाऱ्यांना सैनिकी शिक्षण आवश्यक : लेफ्टनंट जनरल निंभोरकर
“सर्जिकल स्ट्राईकची तयारी अवघ्या सात दिवसात केली. 21 तारखेला आम्हाला सांगण्यात आलं आणि 28 तारखेला आम्ही केलं”, असे लेफ्टनंट जनरल आर. आर. निंभोरकर यांनी सांगितले.
मुंबई : राजकारणात येणाऱ्या 90 टक्के लोकांना सैनिकी शिक्षण आवश्यक आहे, असे मत लेफ्टनंट जनरल आर. आर. निंभोरकर यांनी व्यक्त केलं. सर्जिकल स्ट्राईकमागचा ब्रेन म्हणून ज्यांना ओळखलं जातं, त्या लेफ्टनंट जनरल आर. आर. निंभोरकर हे एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या खास कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी सर्जिकल स्ट्राईकसह सैन्याशी संबंधित विषयांवर मनमोकळा संवाद साधला.
“सगळ्यांना मिलिट्री शिक्षण दिलं पाहिजे, असं मला मनापासून वाटतं. ब्रिटनचं उदाहरण घ्या, तिथे प्रिन्ससुद्धा मिलिट्री ट्रेनिंग घेतो. सगळी कामं करतो. अमेरिकेचंच पाहा. तिथल्या बहुतेक अध्यक्षांनी नोकरी केलीय. एक शिस्त अंगी बाणवली जाते. म्हणून मला वाटतं, राजकारणात येणाऱ्या 90 टक्के लोकांनी तर आर्मी ट्रेनिंग घेतली पाहिजे.”, असे लेफ्टनंट जनरल निंभोरकर म्हणाले.
“सर्जिकल स्ट्राईकची तयारी अवघ्या सात दिवसात केली. 21 तारखेला आम्हाला सांगण्यात आलं आणि 28 तारखेला आम्ही केलं”, असे लेफ्टनंट जनरल आर. आर. निंभोरकर यांनी सांगितले.
“सर्जिकल स्ट्राईक पुन्हा होऊ शकतं. पण कसं करणार, हे सांगू शकत नाही. कारण प्रत्येक ऑपरेशन वेगळं असतं, वेगळ्या टाईपचं असतं. इंडियन आर्मी प्रोफेशनल आर्मी आहे. त्यांना सगळं माहित आहे, कसं कसं आणि काय करायचं. फक्त देशाने टास्क दिला की, हे तुम्हाला करायचं, तर अभिमानाने सांगतो, भारतीय सेना कुठेही कमी पडणार नाही.”, असे लेफ्टनंट जनरल निंभोरकर यांनी सांगितले.
“आपण जी अॅक्शन घेतो, त्याविरोधात कुणीही वेगळा स्वर काढायला नको. आज पक्ष ए असेल, उद्या बी असेल. आमची निष्ठा भारतीय घटनेशी आहे. आम्ही आपल्या देशाशी जबाबदार आहोत. त्यामुळे देशाने जे नॉमिनेट केलेले असतात, ते जसे निर्णय घेतात, ते आम्ही फॉलो करतो.”, असे लेफ्टनंट जनरल निंभोरकर यांनी नमूद केले.
पाहा संपूर्ण माझा कट्टा :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
भारत
भारत
Advertisement