एक्स्प्लोर

भाजपला गोपीनाथ मुंडेंचा विसर, कार्यकर्ते नाराज

राज्यभरातून मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक भाजपवर नाराज आहेत.

मुंबई : भाजपच्या 38 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईच्या एमएमआरडीए ग्राऊंडवर आज भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक भाजपवर नाराज आहेत. भाजपच्या या कार्यक्रमातील एकाही पोस्टरवर गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नाही. गोपीनाथ मुंडे यांचा विसर पडल्याने बीडचे मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. ठिकठिकाणी झळकत असलेल्या पोस्टर्सवरून गोपीनाथ मुंडे यांचा फोटो गायब आहे. त्यामुळे मुंडे समर्थकांनी सभास्थळी घोषणाबाजी सुरू केली. गोपीनाथ मुंडे यांचा फोटो पोस्टरवर लावण्याची मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे. ''राज्यात भाजप पक्ष आहे, तो गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे आहे, मात्र इथे आल्यानंतर त्यांचा फोटोच बॅनरवर नसल्याचं दिसलं. भाजपने बॅनरवर त्यांचा फोटो लावावा,'' अशी मागणी मुंडे समर्थकांनी केली. दरम्यान, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी नाराज कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते आक्रमक होत असल्याचं लक्षात आणून दिल्यानंतर मुंडे भगिनींनी मंचावरून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून भाजपचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्यासाठी भाजपने 28 विशेष ट्रेनची व्यवस्था केली होती. या ट्रेन पनवेल, ठाणे, दादर, सीएसएमटी आणि वांद्रे या स्थानकात थांबणार होत्या. मात्र विशेष ट्रेन असल्याने त्यांना विलंब झाला. ठाणे स्थानकात जी ट्रेन 9 वाजता येणे अपेक्षित होते, ती पाहिली ट्रेन 1 वाजता अली. त्यानंतर इतर रेल्वे आल्या. या कार्यक्रमासाठी भाजप अध्यक्ष अमित शाह हे मुंबईत आले आहेत. गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारास ते मुंबई विमानतळावर दाखल झाले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीद्वारे त्यांचं जंगी स्वागत केलं. विमानतळ ते बीकेसीपर्यंत बाईक रॅली काढण्यात आली. संबंधित बातम्या :

भाजपचा महामेळावा, मुंबईकरांना मनस्ताप, भाजपच्या बस रोखल्या

भाजपचा स्थापना दिवस, मुंबईत जंगी कार्यक्रम

या मार्गांवर प्रवास टाळा, भाजपच्या महामेळाव्यामुळे वाहतूक कोंडी होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Chandiwal Ayog : 100 कोटी खंडणी प्रकरण, इनसाईड स्टोरी काय?Sanjay Shirsat On Chandiwal : 'चांदीवाल ते सचिन वाझे' गौप्यस्फोटांवर शिरसाट यांची प्रतिक्रियाVidhan Sabha Manchar Reaction : सख्ख्या भावांनी आम्हाला रडवलं मंचरकरांचा मूड कुणाच्या बाजूने?Chitra Wagh Akola On Supriya Sule : बारामतीच्या ताईंनी आपल्या अडाणीपणाचे प्रदर्शन नाही केलं पाहिजे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Donald Trump : दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
Embed widget