एक्स्प्लोर

आमदार रमेश लटके यांच्यावर अंत्यसंस्कार; मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबियांचं सांत्वन, शिवसेना नेत्यांची हजेरी

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्यावर आज (13 मे) मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसह रमेश लटके यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं.

मुंबई : शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्यावर आज (13 मे) मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसह रमेश लटके यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. आज सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्र्यांनी रमेश लटके यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते.

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश लटके बुधवारी (11 मे) संध्याकाळी दुबईत हृदयविकाराने निधन झालं. ते दुबईला आपल्या कुटुंबासह फिरायला गेले होते. परंतु तिथेच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिन्यात 21 एप्रिल रोजी त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता. ते मूळचे ​कोल्हापुरातील शाहूवाडीचे होते. 

निधनानंतर रमेश लटके यांचं पार्थिव दुबईहून मुंबईत आणण्यात आलं. त्यानंतर आमदार भवन इथे त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. मुख्यमंत्र्यांनी आमदार रमेश लटके यांना श्रद्धांजलीही वाहिली. यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब यांचीही उपस्थिती होती. एक कडवट शिवसैनिक गमावल्याच्या भावना यावेळी उपस्थित शिवसेना नेत्यांनी व्यक्त केली.

Ramesh Latke Death : शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे दुबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

Ramesh Latke : गटप्रमुख ते आमदार! दांडगा जनसंपर्क; रमेश लटकेंचा अफलातून राजकीय प्रवास

रमेश लटके यांच्या निधनाने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. दांडगा जनसंपर्क असलेल्या आमदाराच्या निधनाने मतदारसंघात देखील शोककळा पसरली आहे. 52 वर्षात त्यांचा राजकीय प्रवास मात्र भन्नाट होता. शिवसेनेचा अंधेरी भागातला एक विश्वासू चेहरा अशी त्यांची ओळख होती. एक नजर टाकूया रमेश लटके यांच्या राजकीय कारकिर्दीवर

सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष ते आमदार
- रमेश लटके यांनी सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. 
- गटप्रमुख ते आमदार असा त्यांचा अफलातून राजकीय प्रवास होता. 
- या प्रवासादरम्यान त्यांनी शाखाप्रमुख, नगरसेवक ही आणि अशी विविध पदं यशस्वीरित्या भूषवली. 
- रमेश लटके यांनी 1997 ते 2012 अशा सलग 3 वेळा नगरसवेक पद भूषवलं. 
- त्यानंतर 2014 मध्ये लटके यांनी पहिल्यांदा अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

तीन वेळा नगरसेवक, सलग दोन वेळा आमदार
- 1997 साली मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून लटके हे निवडून आले. 
- त्यानंतर 2002 आणि 2009 च्या महापालिका निवडणुकीत विजयी होत ते महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. 
- तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले. 
- त्यानंतर 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत अंधेरी पूर्वच्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा निवडून दिले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

MGNREGA : 'मनरेगा'तून महात्मा गांधींचे नाव हटणार, 'विकसित भारत जी राम जी' नावाने नवे रोजगार हमी विधेयक तयार
'मनरेगा'तून महात्मा गांधींचे नाव हटणार, 'विकसित भारत जी राम जी' नावाने नवे रोजगार हमी विधेयक तयार
Devendra Fadnavis: इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही; सीएम फडणवीसांचा निर्धार
इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही; सीएम फडणवीसांचा निर्धार
मी नाभिक समाजाची माफी मागतो, बोलण्याच्या ओघात बोलून गेलो; जयंत पाटलांकडून जाहीरपणे दिलगिरी
मी नाभिक समाजाची माफी मागतो, बोलण्याच्या ओघात बोलून गेलो; जयंत पाटलांकडून जाहीरपणे दिलगिरी
Thane Metro: ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती

व्हिडीओ

Vinod Ghosalkar : मुलाची हत्या, सूनेचा भाजपत प्रवेश; ठाकरेंचे कट्टर विनोद घोसाळकर रडले
Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | Maharashtra News | 15 DEC 2025 : ABP Majha
Maharashtra Election Commission PC : पालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार?, ४ वाजता पत्रकार परिषद
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Tejasvee Ghosalkar PC : ठाकरेंना जय महाराष्ट्र, तेजस्वी घोसाळकरांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MGNREGA : 'मनरेगा'तून महात्मा गांधींचे नाव हटणार, 'विकसित भारत जी राम जी' नावाने नवे रोजगार हमी विधेयक तयार
'मनरेगा'तून महात्मा गांधींचे नाव हटणार, 'विकसित भारत जी राम जी' नावाने नवे रोजगार हमी विधेयक तयार
Devendra Fadnavis: इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही; सीएम फडणवीसांचा निर्धार
इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही; सीएम फडणवीसांचा निर्धार
मी नाभिक समाजाची माफी मागतो, बोलण्याच्या ओघात बोलून गेलो; जयंत पाटलांकडून जाहीरपणे दिलगिरी
मी नाभिक समाजाची माफी मागतो, बोलण्याच्या ओघात बोलून गेलो; जयंत पाटलांकडून जाहीरपणे दिलगिरी
Thane Metro: ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो, याचा रेकॉर्ड करायचाय; नितीन गडकरींचा सनदी अधिकाऱ्यांना इशारा
मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो, याचा रेकॉर्ड करायचाय; नितीन गडकरींचा सनदी अधिकाऱ्यांना इशारा
Video: सुनेचे कान धरता येत नाहीत, आज अभिषेक नाही; तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर सासरे विनोद यांना रडू कोसळले
Video: सुनेचे कान धरता येत नाहीत, आज अभिषेक नाही; तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर सासरे विनोद यांना रडू कोसळले
Pune Crime News: चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला अन्...
चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला अन्...
Pune Accident News: चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं; बस थेट मेट्रोच्या पिलरला धडकली, मागून आलेल्या ट्रकचीही धडक, शिवाजीनगर परिसरात मोठी वाहतूक कोंडी
चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं; बस थेट मेट्रोच्या पिलरला धडकली, मागून आलेल्या ट्रकचीही धडक, शिवाजीनगर परिसरात मोठी वाहतूक कोंडी
Embed widget