एक्स्प्लोर

लोणावळा-कर्जत घाट विभागात भूस्खलन, काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्य  पर्यायी मार्गाने वळवल्या

पावसाच्या पार्श्वभूमीवर रेल्व विभागानं देखील मोठा निर्णय घेतला आहे. काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर  पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.

मुंबई : मुंबईसह ठाणे, पालघर त्याचबरोबर कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. कारण अनक ठिकाणी रस्त्यांवर घरांमध्ये पाणी शिरलं आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळं काही भागात दुर्घटना देखील घडल्या आहेत. मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत राज्यात 9 जणांचा बळी गेला आहे. तर 4 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या पावसाच्या पार्श्वभूमीवर रेल्व विभागानं देखील मोठा निर्णय घेतला आहे. काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर  पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.

कर्जत–लोणावळा मार्गादरम्यान घाट विभागात भूस्खलन 

कर्जत–लोणावळा मार्गादरम्यान घाट विभागात भूस्खलन झालं आहे. यामुळं रेल्वे सेवांवर मोठा परिणाम झाला आहे. 200 हून अधिक कर्मचारी युद्धपातळीवर कार्यरत आहेत. लोणावळा–कर्जत घाट विभागातील ठाकूरवाडी केबिन आणि मंकी हिल केबिनदरम्यान झालेल्या भूस्खलनामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा प्रकार घडला. 6 जुलै रोजी अवघ्या चार तासांत 140 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. याआधी 5 जुलै रोजी 327 मिमी आणि 4 जुलै रोजी 162 मिमी पाऊस झाला होता.

रेल्वे सेवांवरील परिणाम :

- एकूण 26 गाड्या रद्द
- 47 गाड्यांचे मार्ग बदलले
- 19 गाड्या अंशतः गंतव्यापर्यंतच धावणार
- 15 गाड्या अंशतः प्रारंभ करण्यात आल्या
- 3 गाड्या पुनर्नियोजित (Rescheduled)
- 5 गाड्या पुनर्नियोजित करून मार्गही बदलण्यात आला

अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत

मुंबई- पुणे मार्गावरील डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस, सिंहगड एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस यांसह अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या कल्याण–इगतपुरी–मनमाड–दौंड किंवा सुरत–जळगाव–मनमाड–दौंड या पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. घाट विभागात सुरू असलेल्या पुनर्बांधणी आणि ट्रॅक सुरक्षिततेच्या कामासाठी 200 कर्मचारी तैनात करण्यात आले असून, आणखी 200 अतिरिक्त कर्मचारी घटनास्थळी पाठवण्याची तयारी सुरू आहे. रेल्वे प्रशासनाकडून ट्रॅक सुरक्षित झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्यात येणार असून, प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पहाटे चार वाजता मिसिंग लिंकवर दरड कोसळली

पहाटे चार वाजता मिसिंग लिंकवर दरड कोसळली आहे. धबधब्यासारखं पाणी वाहू लागलं आहे. कमानी सारखं बांधकाम कोसळलं. हा सगळा राडारोडा हटवायला साडे अठरा तास लागले अन पुण्याहून मुंबईकडे जाणारी मिसिंग लिंकची मार्गिका खुली करण्यात आली. पण यानिमित्ताने सात हजार कोटी खर्चून उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंकबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले.

 

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Advertisement

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget