Lalbaugcha Raja: लालबागच्या राजाचरणी भाविकांकडून भरभरुन दान; राजाच्या दानपेटीत साडे तीन किलो सोने, 64 किलो चांदी
Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाचरणी भाविकांकडून भरभरुन दान केले आहे. राजाला चक्क एका भक्ताने इलेक्ट्रिक बाईक दान केली आहे.
मुंबई : 'नवसाला पावणारा बाप्पा' अशी ख्याती असलेल्या मुंबईतील (Mumbai) 'लालबागच्या राजा' च्या (Lalbaugcha Raja) दर्शनाला देशभरातून भक्तांची रांग लागते. 'लालबागचा राजा'च्या चरणी भक्तांनी दहा दिवसात कोट्यवधींचं दान जमा केलं आहे. फक्त मुंबईच नव्हे तर अगदी परदेशी पाहुणेही 'लालबागचा राजा'चा थाट बघण्यासाठी गर्दी करतात. दहा दिवसात 'लालबागचा राजा'च्या चरणी पाच कोटीचे दान जमा झालं आहे
दरवर्षी लालबागचा राजाला किती देणगी जमा होते, याची माहिती मंडळातर्फे दिली जाते. राजाच्या दानपेटीत किती देणगी जमा होते, याची आकडेवारी जाणून घेण्यासाठी लोकांमध्येही कुतूहल पाहायला मिळतं. सोने, चांदी, रोख रक्कम याशिवाय दानपेटीत चिठ्ठ्या टाकून भाविकांनी लालबागच्या राजाला आपल्या मनातल्या भावनाही कळवल्या जातात. लालबागच्या राजाच्या चरणी आलेल्या दानाची मोजदाद मंडळाकडून करण्यात आली. दहा दिवसांमध्ये लालबागच्या राजाच्या चरणी पाच कोटी सोळा लाख रुपये रोख रक्कमेचं दान आलं आहे. तर साडेतीन किलो सोनं आणि 64 किलो चांदी यावेळी लालबागच्या राजाच्या चरणी दान करण्यात आली आहे.
इलेक्ट्रिक बाईक अर्पण
लालबागच्याजाच्या चरणी अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव करण्यात आला. जवळपास एक किलोचा सोन्याचा हार, चांदीची गदा, सोना चांदीचे मोदक, चांदीचा मूषक राज, चांदीचे नारळ, चांदीचे ताट, विविध पूजेची सामग्री, चांदीचे छत, चांदीचा कळस, सोन्या चांदीची नाणी, सोनेरी गुलाबाचा हार, चांदीची पंक्ती, छोटे मोठे चांदीचे गणपती, सीजन क्रिकेट बॅट ,सोन्याचा मुलामा दिलेला चांदीच मुकूट भक्तांनी अर्पण करण्यात आले आहे. तसेच या वर्षी इलेक्ट्रीक बाईक आकर्षणाचा विषय ठरली आहे. राजाला चक्क एका भक्ताने इलेक्ट्रिक बाईक दान केली आहे. लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या वस्तू घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. राजाच्या मंडपात (Lalbaugcha Raja Ganpati Mandal) दर्शनासाठी यंदा तुफान गर्दी होती.
मुंबईतल्या लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja) दानपेटीत गणेशभक्तांकडून जितकं सढळ हातानं दान करण्यात येतं, तितक्याच सहजतेनं काही भक्त आपलं मनही देवाकडे मोकळं करत असतात. ही भक्तमंडळी दरवर्षी लालबागच्या राजाला पत्र (Letter To Lalbaugcha Raja) लिहून गाऱ्हाणं मांडत असतात.
हे ही वाचा :