एक्स्प्लोर
लालबाग फ्लायओव्हरवर रॅश ड्रायव्हिंग, दोघांचा मृत्यू
भांडूप परिसरातील दोन तरुण रात्री अडीचच्या सुमारास लालबागच्या फ्लायओव्हरुन, दुचाकीवरुन अत्यंत वेगानं जात होते.

मुंबई: मुंबईत काल रात्री वेगवान दुचाकी चालवणं दोघांच्या जीवावर बेतलं. भांडूप परिसरातील दोन तरुण रात्री अडीचच्या सुमारास लालबागच्या फ्लायओव्हरुन, दुचाकीवरुन अत्यंत वेगानं जात होते. त्याच वेळी त्यांची दुचाकी घसरली आणि जवळपास 50 ते 75 मीटर अंतरावर असलेल्या डिव्हायडरवर जाऊन आदळली. या घटनेत दोन्ही तरुण गंभीर झाले. पोलिसांनी दोघांना उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. यासीन आणि विजय अशी दोन्ही मृत तरुणांची नावं आहेत. या भीषण अपघाताची माहिती पोलिसांनी मृत तरुणांच्या कुटुंबियांना दिली. दरम्यान, वांद्रे, माहिमपासून पुढे भायखळा, भेंडीबाजारपर्यंत दुचाकीवरुन सुसाट जाणारे, शर्यत लावणाऱ्या तरुणांची संख्या जास्त आहेत. वाहतुकीचे नियम तोडून, हे तरुण रॅश ड्रायव्हिंग करतात. अनेकवेळा त्यांचं रॅश ड्रायव्हिंग दुसऱ्यांच्या जीवावर बेतलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























