Lalbaug Case : रागाच्या भरात मुलीने घेतला जन्मदात्या आईचा जीव, लालबाग हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
बारावीपर्यंतच शिकलेल्या रिम्पलने इलेक्ट्रिक मार्बल कटर, कोयता आणि चाकू यांचा वापर करत आईच्या मृतदेहाचे तुकडे केले हे पुढे पोलीस तपासात समोर आले.
Mumbai Crime : मुंबईतल्या लालबाग परिसरात दोन महिन्यापूर्वी झालेल्या एका महिलेच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती आज उजेडात आली. त्या महिलेच्या मुलीनं रागाच्या भरात आपल्या जन्मदात्या आईचा जीव घेतल्याचं निष्पन्न झालं आहे. ही घटना लालबागमध्ये मार्च महिन्यात घडली होती. मयत वीणा जैन यांचं डोकं आणि धड त्यांची मुलगी रिम्पलनं दोन साड्यांमध्ये गुंडाळून ते प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकत कपाटाच्या खालच्या कप्प्यात लपवलं होतं. तसंच बाथरूममधील स्टीलच्या टाकीत वीणा यांच्या शरीराचे इतर अवयव कापून ठेवण्यात आले होते. वीणा जैन यांच्या घरातून त्यावेळी दोन संगमरवरी कटर, एक विळा, एक हातोडा, चाकू आणि एक पेव्हर ब्लॉक सापडला होता. त्याच्या आधारे तपास करून पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली आहे.
आईला रागाच्या भरात तीक्ष्ण हत्याराने ठार मारून तिच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करून अडीच महिने घरातच लपवून ठेवल्याची मन विषण्ण करणारी घटना 14 मार्चला लालबागसारख्या परिसरात उजेडात आली होती .या प्रकरणात आता पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केले असून त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 55 वर्षीय विना जैन मृत्यू प्रकरणी शवविच्छेदनात गळा दाबल्याचे पुरावे सापडले आहेत. फॉरेन्सिक तपासणीत असे दिसून आले आहे की, तिचा मृत्यू डोक्याला दुखापत झाल्यामुळे झाला आहे.
संशय कसा आला ?
दोन महिन्यांपासून वीणा चाळीत कुठेच दिसत नव्हत्या. चाळीतील लोकांनी तसे पोरवाल यांना कळवले. मंगळवारी सायंकाळी पोरवाल यांची मुलगी पैसे देण्यासाठी कासम चाळीत आली. मात्र, रिम्पलने आई झोपली असल्याचे सांगत तिला घरात घेतले नाही. त्यानंतर मामीने घराचा कानोसा घेतला. परंतु तिलाही रिम्पलने बाहेरच थांबवत दार उघडले नाही. संशय आल्याने पोरवाल यांच्या मुलाने दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला. तेव्हा वीणा तिथे दिसल्या नाहीत. आई कानपूरला गेल्याचे रिम्पलने सांगितले. अखेरीस पोरवाल कुटुंबीयांनी रात्री पोलिस ठाण्यात वीणा जैन बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली
विना बेपत्ता असल्याचा तपास करत असताना पोलिस जैन यांच्या घरात गेले तेव्हा घरभर दुर्गंधी पसरली होती. वीणा जैन यांचे डोके व धड दोन साड्यांमध्ये गुंडाळून ते प्लास्टीकच्या पिशवीत टाकत कपाटाच्या खालच्या कप्प्यात लपविण्यात आले होते. बाथरूममधील स्टीलच्या टाकीत वीणा यांचे शरीराचे इतर भाग कापून ठेवण्यात आले होते. किडे लागलेल्या अवस्थेत हे सर्व अवयव केईएममध्ये पाठविण्यात आले. पोलिसांनी घरातून इलेक्ट्रिक मार्बल कटर, चाकू, कोयता जप्त केले.
काळाचौकी पोलिसांनी 350 पानी आरोपपत्र दाखल केले
बारावीपर्यंतच शिकलेल्या रिम्पलने इलेक्ट्रिक मार्बल कटर, कोयता आणि चाकू यांचा वापर करत आईच्या मृतदेहाचे तुकडे केले हे पुढे पोलीस तपासात समोर आले. या संदर्भात काळाचौकी पोलिसांनी 350 पानी आरोपपत्र दाखल केले. पोलिसांनी 14 मार्च रोजी वीणाच्या शरीराचे पूर्ण कुजलेले अवयव जप्त केले. त्या वेळी गोळा केलेल्या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी रिंपलविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. जैन यांच्या घरातून त्यावेळी दोन संगमरवरी कटर, एक विळा, एक हातोडा, चाकू आणि एक पेव्हर ब्लॉक सापडला होता अन तेच पुरावे या घटनेत पुढे महत्त्वाचे ठरले आहेत आहेत.
पण तरीही मुलगी अजूनही निर्दोष असल्याचे सांगते
काय म्हणते रिम्पल, 27 डिसेंबर 2022 रोजी टॉयलेटला जात असताना वीणा इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली पडली आणि तिचा मृत्यू झाल्याचा दावा मुलगी रिम्पलने केला होता. तिच्या मृत्यूसाठी तिला जबाबदार धरले जाण्याची भीती असल्याने तिने विल्हेवाटीसाठी तिचा मृतदेह कापला, असा दावा रिंपलने कोर्टात केला .तसेच शुक्रवारी जेव्हा माझगाव कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले तेव्हा रिंपलला कोर्टरूममध्ये बोलावण्यात आले, जिथे तिने निर्दोष असल्याचा पुनरुच्चार केला आणि सांगितले की ती निर्दोष आहे