एक्स्प्लोर
Advertisement
भाचीला वाचवलं, लोकलच्या धडकेत नवविवाहितेचा मृत्यू
प्रसंगावधान राखत महिलेने भाचीला दूर ढकलल्यामुळे चिमुरडीचा जीव वाचला, मात्र लोकलच्या धडकेत महिलेला प्राण गमवावे लागले
ठाणे : ठाण्यात पारसिक बोगद्याजवळ रेल्वे रुळ ओलांडताना लोकल ट्रेनच्या धडकेत नवविवाहितेला प्राण गमवावे लागले. विशेष म्हणजे प्रसंगावधान राखत महिलेने सोबत असलेल्या भाचीला दूर ढकलल्यामुळे चिमुरडीचा जीव वाचला.
नाझिया सोळंकी ही महिला रविवारी आपल्या 6 वर्षीय भाचीसोबत मुंब्य्रातील मार्केटमधून घरी परतत होती. वेळ वाचवण्यासाठी त्यांनी पादचारी पूलाऐवजी ट्रॅक ओलांडण्याचा मार्ग निवडला.
रात्री आठ वाजताच्या सुमारास त्या रेल्वे रुळ ओलांडत होत्या. दोन रेल्वे मार्गांवरुन धावणाऱ्या वेगवान लोकलच्या मध्ये त्या अडकल्या. प्रसंगावधान राखून नाझियाने भाचीला ढकललं आणि तिचा जीव वाचवला, मात्र तोपर्यंत नाझियाला लोकलची धडक बसली होती. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार स्थानिकांनी दोघींना आरडा-ओरडा करुन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकल त्यांच्या जवळ आल्या होत्या. अवघ्या एकाच दिवसापूर्वी याच ठिकाणी 45 वर्षीय व्यक्तीचा लोकलच्या धडकेत मृत्यू झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement