एक्स्प्लोर
एक शरीर, दोन तोंडं, सायन रुग्णालयात सयामी जुळ्यांचा जन्म
मुंबई : मुंबईच्या सायन रुग्णालयात एक शरीर आणि दोन तोंडं असलेल्या बाळांचा जन्म झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे या बाळ आणि बाळंतीण या दोघांचीही प्रकृती उत्तम आहे.
साईन खान या महिलेने सायन रुग्णालयात या बाळांना जन्म दिला आहे. यांना सयामी जुळेच म्हणता येईल, मात्र यात एका बाळाची संपूर्ण वाढ झाली आहे, तर दुसऱ्या बाळाचं तोंड, छाती आणि पोटाकडचा भाग पहिल्या बाळाला जोडला गेला आहे.
या बाळाला दोन तोंडे आणि तीन हात आहेत. तूर्तास ऑपरेशन केलं तर धोका संभवत असल्यानं यावर संपूर्ण विचार करुन मगच बाळाची सर्जरी केली जाईल. तूर्तास या बाळाला विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. मात्र बाळाचं ऑपरेशन करायचं की नाही? याचा निर्णय अद्याप झालेला नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement