एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO: दहा महिन्याच्या चिमुकलीला पाळणाघरात अमानुष मारहाण
नवी मुंबई: तुम्ही तुमच्या चिमुकल्यांना पाळणाघरात ठेवत असाल तर शंभरवेळा विचार करा. कारण नवी मुंबईतील पूर्वा प्ले स्कूलच्या पाळणाघरात अवघ्या 10 महिन्यांच्या चिमुकलीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. अतिशय निर्दयीपणे चिमकुलीला मारहाण करण्याचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
खारघर सेक्टर १० मध्ये पूर्वा प्ले स्कूल आणि नर्सरी आहे. या ठिकाणी काही चिमुकली पाळणा घरात आहेत. आज दुपारी पाळणाघरातील आया अफसाना नासीर शेख हिनं एका चिमुकलीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली. ज्यात मुलीच्या डोक्याला जखम झाली आहे.
जखमी चिमुकलीला उपचारासाठी वाशीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, याप्रकरणी खारघर पोलिसात आया अफसाना शेख आणि पाळणा घराची मालकीण प्रियंका निकमवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या सर्व प्रकारानं पालकांमध्ये भीती पसरली आहे.
मारहाण झालेल्या चिमुकलीच्या पालकांशी जेव्हा एबीपी माझानं संपर्क साधला त्यावेळी त्यांनी या सर्व प्रकाराबाबत माहिती दिली.
'माझ्या चिमुकलीला मारहाण करणाऱ्या महिलेवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा'
'आम्ही मुलीला पाळणाघरात ठेवण्याचा पहिलाच दिवस होता. आम्ही दोघंही कामानिमित्त बाहेर जातो. त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव मुलीला पाळणाघरात ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. पहिल्याच दिवशी मुलीला घरी आणल्यानंतर ती खूप गप्प होती. तिच्या डोक्याला थोडीशी जखम झाल्याचं आम्हाला जाणवलं. त्यानंतर आम्ही मुलीला डॉक्टरांकडे नेलं. तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की, तुमच्या मुलीला कुणीतरी मारहाण केली आहे. डॉक्टरांंनी तात्काळ तिचं सिटीस्कॅन केलं. तेव्हा तिच्या मेंदूला थोडी दुखापत झाल्याचं समोर आलं. पण वेळीच ही गोष्ट लक्षात आल्यानं त्यावर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले. सध्या मुलीच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.'
'या सर्व प्रकारानं आम्ही आधीच हादरुन गेलो होतो. त्यानंतर सर्व गोष्टींचा अंदाज बांधून आम्ही पाळणाघराचं सीसीटीव्ही तपासलं. त्यावेळी धक्कादायक चित्र आम्हाला पाहायला मिळालं. सीसीटीव्हीमध्ये आम्हाला स्पष्ट दिसलं की, माझ्या मुलीला पाळणाघरातील महिला बेदम मारहाण करीत होती. त्यानंतर आम्ही तात्काळ पोलिसात धाव घेतली. पण पोलिसांनी हे प्रकरण तेवढ्या गांभीर्यानं घेतलं नाही. तसंच या पाळणाघराच्या मालकिणीच्या नवऱ्यानं मला पोलिसात गेल्यानं धमकी दिली.'
'या सर्व प्रकरणावर माझी मागणी आहे की, माझ्या चिमुकलीला मारहाण करणाऱ्या या महिलेवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे. तसंच जेव्हा माझ्या मुलीला मारहाण होत असताना इतर मुलं इतके गाढ कसे काय झोपले होते? त्या मुलांसोबत देखील असंच काही झालं होतं का?' अशी माहिती या चिमुकलीच्या पालकांनी एबीपी माझा दिली आहे.
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
Advertisement