एक्स्प्लोर

शूलेस बांधणाऱ्या मुलावरुन गाडी नेणाऱ्या महिलेवर गुन्हा

मुंबईतील दिंडोशी भागात राहणाऱ्या श्रद्धा चंद्राकर यांचा निष्काळजीपणा चिमुरड्याच्या जीवावर बेतला असता.

मुंबई : कारखाली येऊनही आश्चर्यकारकरित्या बचावलेल्या मुलाचा शोध लागला आहे. निष्काळजीपणे गाडी चालवणाऱ्या महिलेची माहितीही 'एबीपी माझा'च्या हाती लागली आहे. मुंबईतील दिंडोशी भागात राहणाऱ्या श्रद्धा चंद्राकर यांचा निष्काळजीपणा चिमुरड्याच्या जीवावर बेतला असता. श्रद्धा चंद्राकर आणि गाडीखाली आलेला मुलगा गोरेगावमधील दिंडोशी भागातल्या सद्गुरु कॉम्प्लेक्समध्ये राहतात. गाडी बाहेर काढताना चंद्राकर यांनी केलेल्या हलगर्जीमुळे चिमुरडा गाडीखाली आला होता. 24 तारखेला संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी पालकांना विचारणा केल्यानंतर आता श्रद्धा चंद्राकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटर वाहन कायद्यातील कलम 337 आणि 134 नुसार बेदरकारपणे गाडी चालवणे आणि पोलिसांपासून अपघाताची माहिती लपवून ठेवणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा अजामीनपात्र असल्याने आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. काय आहे प्रकरण ? 24 सप्टेंबरला संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास आरोपी श्रद्धा चंद्राकर आपली कार इमारतीच्या पार्किंगमधून काढत होत्या. याच ठिकाणी काही मुलं फुटबॉल खेळत होती. यातील एका मुलाच्या बुटाची लेस सुटली आणि तो कारच्या बाजूला लेस बांधण्यासाठी बसला. त्याचवेळी श्रद्धा यांनी गाडी सुरु केली आणि अक्षरशः ती कार मुलाच्या अंगावरुन नेत त्या निघून गेल्या. क्षणभर हा मुलगा गाडीखाली चिरडला गेला असावा, असं सीसीटीव्ही पाहताना वाटतं, मात्र गाडी निघून गेल्यावर हा मुलगा सुरक्षितपणे उठून उभा राहिला आणि धावत पुन्हा खेळायला गेला. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला. सीसीटीव्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर या ठिकाणी ही गंभीर घटना घडल्याचं सर्वांच्या निदर्शनास आलं. लहान मुलं खेळत असताना पालकांनी आणि वाहनचालकांनी दक्षता बाळगण्याची गरज अधोरेखित होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Embed widget