एक्स्प्लोर

महिलांना बळ देणाऱ्या लेडी रायडरचा खड्ड्यामुळे करुण अंत

एक खड्डा... रस्त्यावरचा एक खड्डा किती मोठं नुकसान करु शकतो, याचं विषण्ण करणारं उदाहरण पालघरमध्ये पहायला मिळालं. आपल्या तत्त्वांवर जगणारी एक महिला, स्त्रियांना नवं बळ देणारी एक महिला... एका खड्ड्यामुळे या जगातून कायमची निघून गेली...

मुंबई/पालघर : एक खड्डा... रस्त्यावरचा एक खड्डा किती मोठं नुकसान करु शकतो, याचं विषण्ण करणारं उदाहरण पालघरमध्ये पहायला मिळालं. आपल्या तत्त्वांवर जगणारी एक महिला, स्त्रियांना नवं बळ देणारी एक महिला... एका खड्ड्यामुळे या जगातून कायमची निघून गेली... अवघा देश पालथा घालणाऱ्या जागृती होगाळे या महिला बुलेट रायडरला एका खड्ड्याने चकवलं. मूळची मुंबईची जागृती होगाळे मुंबई-अहमदाबाद मार्गावर वेती गावाजवळ रायडिंग करत होती. त्यावेळी तिची 350 सीसी रॉयल एन्फिल्ड थंडरबर्ड खड्ड्यात आदळली. त्यामुळे ती खाली पडली आणि ट्रकखाली चिरडून गंभीर जखमी झाली. तिच्यासोबत असलेल्या दोन बाईक रायडर्सनी तात्काळ तिला हॉस्पिटलला नेलं, मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तिने हेल्मेट घातलं होतं, मात्र ट्रकखाली सापडल्याने तिचा मृत्यू ओढावला. जागृतीच्या पश्चात पती विराज आणि 9 वर्षांचा मुलगा आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये पालघर जिल्ह्यातल्या खड्ड्यांनी 4 चालकांचा जीव घेतला आहे. त्यानंतरही झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग आलेली नाही. त्यामुळे स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

खड्ड्यात बाईक आदळून महिला रायडरचा मृत्यू

जागृती होगाळे ही गृहिणी असली, तरी मुंबईमध्ये बाईकरनी नावाच्या ग्रुपची ती अॅक्टिव्ह मेंबर होती. ज्या महिलांना बाईक रायडिंगची आवड आहे, अशा महिलांची मोट बांधून तिने मोठमोठ्या मोहिमा आखल्या होत्या. महाराष्ट्रासह देशभरातल्या अनेक खडतर वाटा जागृतीने धुंडाळल्या होत्या. लडाखपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून अरुणाचलपर्यंत जागृतीचा थक्क करणारा प्रवास होता. मुंबईतल्या मोरया ढोल ताशा पथकाची ती सदस्य होती. वांद्र्यातल्या कलानगरमध्ये ती राहायची जाहिरात क्षेत्रामध्ये फ्रीलान्सिंग काम करत असतानाच तिने रायडिंगची आवड जोपासली.
एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 5 कोटींचे 3.2 किलो सोनं जप्त, एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांसह 7 जण अटकेत
मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 5 कोटींचे 3.2 किलो सोनं जप्त, एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांसह 7 जण अटकेत
घरगुती गॅस 29 रुपयांनी महागला, शरद पवारांची मोदी सरकारवर टीका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 'योग्यवेळी' प्रतिक्रिया
घरगुती गॅस 29 रुपयांनी महागला, शरद पवारांची मोदी सरकारवर टीका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 'योग्यवेळी' प्रतिक्रिया
Sunil Tatkare: रोहित पवारांना कोण विचारतंय? सुनिल तटकरेंनी भाजप प्रवेशाची हिस्ट्रीच काढली; म्हणाले, हडपसरमधून उमेदवारी..
रोहित पवारांना कोण विचारतंय? सुनिल तटकरेंनी भाजप प्रवेशाची हिस्ट्रीच काढली; म्हणाले, हडपसरमधून उमेदवारी..

व्हिडीओ

Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य
Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधी म्हणाले, 18 वर्षीय सार्थक CBI पेक्षा हुशार ठरला; सीबीएसई 12वीच्या ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणालीतील COEMPT कंपनीच्या टेंडरची सार्थककडून पोलखोल
राहुल गांधी म्हणाले, 18 वर्षीय सार्थक CBI पेक्षा हुशार ठरला; सीबीएसई 12वीच्या ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणालीतील COEMPT कंपनीच्या टेंडरची सार्थककडून पोलखोल
आता चीनच्या खांद्यावरून नेपाळने सुद्धा भारतावर तिसरा डोळा वटारण्यासाठी मास्टर प्लॅन आखला; उत्तराखंडमधून भारतीय सीमेच्या आत 10 किलोमीटरपर्यंत हालचाली थेट रेकाॅर्ड करणार
आता चीनच्या खांद्यावरून नेपाळने सुद्धा भारतावर तिसरा डोळा वटारण्यासाठी मास्टर प्लॅन आखला; उत्तराखंडमधून भारतीय सीमेच्या आत 10 किलोमीटरपर्यंत हालचाली थेट रेकाॅर्ड करणार
BCPL: शेअर 100 रुपयांपेक्षा कमी, पूर्व रेल्वेकडून 4.72 कोटींच्या कामाची ऑर्डर, सोमवारी शेअरमध्ये तेजी की घसरण? 
शेअर 100 रुपयांपेक्षा कमी, पूर्व रेल्वेकडून 4.72 कोटींच्या कामाची ऑर्डर, सोमवारी शेअरमध्ये तेजी की घसरण? 
Donald Trump : इराणच्या खजिन्यावर अमेरिकेची नजर, आता संपत्तीचा संघर्ष, डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्लॅननं संकट वाढणार? 
इराणच्या खजिन्यावर अमेरिकेची नजर, आता संपत्तीचा संघर्ष, डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्लॅननं संकट वाढणार? 
मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 5 कोटींचे 3.2 किलो सोनं जप्त, एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांसह 7 जण अटकेत
मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 5 कोटींचे 3.2 किलो सोनं जप्त, एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांसह 7 जण अटकेत
Iran War Live Update: 'आता परिणामांसाठी अमेरिका पूर्णपणे जबाबदार असेल' अमेरिकेने शस्त्रसंधीचा भंग केला, इराणचा गंभीर आरोप
'आता परिणामांसाठी अमेरिका पूर्णपणे जबाबदार असेल' अमेरिकेने शस्त्रसंधीचा भंग केला, इराणचा गंभीर आरोप
थलपती विजयला पाठिंबा देणार हे द्रमुकला अगोदरच सांगितलेलं, इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी चिदंबरम यांचं मोठं वक्तव्य
थलपती विजयला पाठिंबा देणार हे द्रमुकला अगोदरच सांगितलेलं, इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी चिदंबरम यांचं मोठं वक्तव्य
FIFA World Cup : दुनिया मेस्सी-रोनाल्डोच्या प्रेमात वेडी, अन् भारत अजूनही क्रिकेटच्याच दावणीला बांधलेला! फुटबॉल का हरला, क्रिकेट का जिंकलं? वाचा Inside Story
दुनिया मेस्सी-रोनाल्डोच्या प्रेमात वेडी, अन् भारत अजूनही क्रिकेटच्याच दावणीला बांधलेला! फुटबॉल का हरला, क्रिकेट का जिंकलं? वाचा Inside Story
Embed widget