Mumbai Kurla Murder: कुर्ल्यात आढळलेल्या सुटकेसमधील मृतदेहाचे गूढ उकलले, ‘लिव्ह इन’मधून झाला तरुणीचा खून
Kurla Murder Case: चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने ही हत्या केल्याचा संशय आहे. याप्रकरणी महिलेच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई: कुर्ला (Kurla) परिसरात रविवारी रात्री एका सुटकेसमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. कुर्ला मेट्रोच्या बांधकाम साईटवर सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचं गूढ उकललं आहे. संबंधित महिला धारवी येथे राहणारी होती. चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने ही हत्या केल्याचा संशय आहे. याप्रकरणी महिलेच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघे लिव्ह इन रिलेशनमध्ये (Live In Relation) राहत होते.
कुर्ला परिसरात सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या हत्येच्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. रविवारी (19 नोव्हेंबर) कुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत सी.एस टी.रोड शांतीनगरच्या समोरील बाजूला मेट्रो रेल्वेच्या कामाच्या जागेवरील बॅरेकेटचे आतील बाजूस एका सुटकेसमध्ये महिलेच मृतदेह सापडला होता. चारित्र्याच्या संशयावरून हत्या केल्याचा संशय पोलिसांन आहे. दोघेही लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. हत्या आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी प्रियकराला अटक करण्यात आली आहे. महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात आली असून सदर महिला ही धारावी परिसरातील राहणारी आहे. गुन्हे शाखा कक्ष 5 ने महिलेच्या प्रियकराला अटक केली आहे.
हत्येचे नेमकं कारण काय? पोलिसांकडून तपास सुरू
पोलिसांनी त्या जागेवर जाऊन सुटकेसची तपासणी केली असता त्या सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह मिळून आला. सुटकेसमध्ये मृतदेह असल्याने या प्रकरणात खुनाची बाब स्पष्टपणे दिसून येत होती. पोलिसांनी राजावाडी रूग्णालयात मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला होता. महिलेने टीशर्ट आणि नाईट पॅन्ट घातली होती. महिलेचा मृतदेह ज्या सुटकेस बॅगेत आढळला पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. दोघे किती वर्षापासून एकत्र होते? हत्येचे नेमकं कारण काय? याचा तपास पोलिस करत आहे.
लिव्ह इन रिलेशनशिपमधील खुनांच्या गुन्ह्यात वाढ
लिव्ह इन रिलेशनशिपमधील खुनांच्या गुन्ह्यात मोठी वाढ झाल्याचे धक्कादायक चित्र अलीकडच्या घटनांनंतर समोर येत आहे. लिव्ह इन रिलेशनमधील खून झालेल्या तरूणीच्या अमानुषरीतीने हत्या करण्यात आल्या आहे. श्रद्धा वालकर, मिरा भाईंदरमध्ये सरस्वती वैद्य हत्या प्रकरण. अशी अनेक नाव आहेत. नात्यात कडवटपणा का आला? प्रेयसीचे तुकडे करण्याइतपत मानसिकता तयार होते. हल्ली राग आणि टोकाच्या द्वेषामुळे नात्यांतील दुरावा वाढू लागला आहे.
हे ही वाचा :
Nalasopara Crime : वडील-मुलीच्या नात्याला काळीमा! नालासोपाऱ्यात नराधम बापानेच केला पोटच्या मुलीवर अत्याचार, मुलीच्या मृत्यूनंतर आईची तक्रार