एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हितेंद्र ठाकूरांचा पाठिंबा घेऊ, गद्दारांना धडा शिकवू: राष्ट्रवादी
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपविरोधात काँग्रेस,राष्ट्रवादी, शेकाप एकत्र येणार असल्याचा दावा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.
मुंबई: कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या निरंजन डावखरे यांच्याविरोधात राष्ट्रवादीने ठाण्याचे नगरसेवक नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे.
या निवडणुकीसाठी भाजपविरोधात काँग्रेस,राष्ट्रवादी, शेकाप एकत्र येणार असल्याचा दावा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.
“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गद्दाराला धडा शिकवण्याची भूमिका आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने बहुजन विकास आघाडीकडेही पाठिंबा मागितला आहे.
डावखरे आणि हितेंद्र ठाकूर यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पण तरीही हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा सुरु केली आहे. हितेंद्र ठाकूर यांनी भाजप उमेदवाराला म्हणजेच निरंजन डावखरेंना मदत करु नये, राष्ट्रवादीला करावी” असं आवाहन केल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
निरंजन डावखरेंची पक्ष सोडण्याची तयारी एक वर्ष आधीपासूनच सुरु होती. म्हणून राष्ट्रवादीच्या मतदारांना निरंजन डावखरेंनी मतदार म्हणून नोंदणी करु दिली नाही. पण कमी दिवस असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस मेहनत करणार. गद्दारांना धडा शिकवावा असं कार्यकर्त्यांना वाटते, असं आव्हाड म्हणाले.
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील उमेदवार
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीतून आलेल्या निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली आहे.
शिवसेनेकडून ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे मैदानात आहेत.
आता राष्ट्रवादी काँग्रेसने नजीब मुल्ली यांना उमेदवारी देण्याचं निश्चित केलं आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघासाठी ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातून मतदान होणार आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम
निरंजन डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघातून 2012 मध्ये निवडून आले होते. त्यांचा कार्यकाळ 7 जुलै 2018 रोजी संपणार आहे. मात्र त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.
त्यानुसात आता पदवीधर निवडणुकांसाठी 25 जूनला मतदान होणार आहे, तर 28 जूनला मतमोजणी होणार आहे.
संबंधित बातम्या
पालघरचा वचपा, कोकण पदवीधर निवडणुकीत शिवसेनेची उडी
मुंबईकर पदवीधरांनो, हे जाणून घ्या....
निरंजन डावखरेंच्या भाजपप्रवेशाची 'इन्साईड स्टोरी'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement