एक्स्प्लोर

एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे पुन्हा चर्चेत, 63 एन्काऊंटर, महत्वाच्या प्रकरणांमध्ये नाव, शिवसेनेशी जवळीक!

पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव पहिल्यांदाच चर्चेत आलेलं नाही. याआधीही काही प्रकरणांमध्ये वाझे यांचं नाव समोर आलं होतं. शिवसेनेशी असलेल्या जवळीकीवरुन त्यांच्यावर भाजपसह विरोधकांनी जोरदार आरोप केले आहेत. हे सचिन वाझे नेमके कोण आहेत? (Who is Sachin Vaze) हे जाणून घेऊयात.

Sachin Vaze: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणावरुन जोरदार वादंग उठलं आहे. ज्या गाडीत स्फोटकं होती त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत आढळून आल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणाच्या केंद्रस्थानी एक नाव आहे ते म्हणजे एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे याचं. पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव पहिल्यांदाच चर्चेत आलेलं नाही. याआधीही काही प्रकरणांमध्ये वाझे यांचं नाव समोर आलं होतं. विशेष म्हणजे वाझे यांच्या शिवसेनेशी असलेल्या जवळीकीवरुन त्यांच्यावर भाजपसह विरोधकांनी जोरदार आरोप केले आहेत. हे सचिन वाझे नेमके कोण आहेत? (Who is Sachin Vaze) हे जाणून घेऊयात.

कोण आहेत सचिन वाझे?

सचिन वाझे 1990 मध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून मुंबई पोलिसात ज्वाईन झाले होते. त्यांनी आतापर्यंत 63 एन्काऊंटर केले आहेत.

नुकतंच Republic TV चे संपादक अर्णब गोस्वामी यांना त्यांनी घरातून अटक केली होती. गोस्वामींच्या अटकेसाठी तयार केलेल्या टीमचं नेतृत्व सचिन वाझे यांनी केलं होतं.

सचिन वाझे करीब 13 वर्षांनंतर 6 जून, 2020 रोजी पुन्हा पोलिस फोर्समध्ये परतले आहेत. त्यांनी 2007 मध्ये मुंबई पोलिसातून राजीनामा दिला होता.

वाझे यांनी छोटा राजन आणि दाऊद इब्राहिमच्या अनेक गुंडांचा एन्काऊंटर केला आहे. एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा त्यांचे बॉस होते.

सचिन वाझेंसह 14 पोलिस कर्मचाऱ्यांना 2004 मध्ये सस्पेंड करण्यात आलं होतं. या सर्वांवर 2002 घाटकोपर ब्लास्टचा आरोपी ख्वाजा यूनिसच्या कस्टोडियल डेथचा आरोप होता.

सस्पेंशन काळ संपल्यानंतर नाराज होत त्यांनी 2007 मध्ये पोलिस फोर्सचा राजीनामा दिला.

30 नोव्हेंबर 2007 रोजी त्यांनी मुंबई पोलिसांची नोकरी सोडल्यानंतर 2008 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता.

2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळात सचिन वाझे पुन्हा पोलिस फोर्समध्ये परतले.

Antilia Bomb Scare | गाडी दिसल्यावर पहिल्यांदा सचिन वाझे पोहोचले, घटनाक्रम शंका निर्माण करणारा, तपास एनआयएने करावा : देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीसांकडून वाझेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित केले. यावेळी ते म्हणाले की, "मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर रात्री एक वाजता गाडी पार्क झाली. तीन वाजता ड्रायव्हर मागच्या गाडीतून पळून गेला. एकच गाडी नव्हती, स्कॉर्पिओपाठोपाठ आणखी एक गाडी आली. दोन्ही गाड्या ठाण्यातून आल्या. ही गाडी तिथे पार्क होती, तिची ओळख पटल्यानंतर सर्वात आधी मुंबई पोलिसांचे सचिन वाझे तिथे पोहोचले. कोणीही पोहोचण्याच्याआधी ते आले, क्राईमचे पोलीस आहेत, मग स्थानिक पोलीस आले. मग सचिन वाझेंना आयओ म्हणून अपॉईंट केलं. तीन दिवसांपूर्वी त्यांच्याऐवजी एका एसीपींना आयओ म्हणून नेमलं. सचिन वाझेंना का काढलं? हे मला समजलं नाही. पण यात योगायोग आहे. माझ्याकडे सीडीआर आहे, गाडीमालकाने गाडी चोरी झाल्याची तक्रार केली, ती गाडी अंबानींच्या घराबाहेर उभी होती. त्यांनी आपल्या जबाबात एक टेलिफोन नंबर सांगितला आहे. या नंबरचा एका नंबरशी संवाद 8 जून 2020, 25 जुलै 2020 त्यानंतर अनेक वेळा दिसतोय. हा नंबर आहे, सचिन हिंदुराव वाझे. ज्या दिवशी ही गाडी ठाण्याला बंद पडल्यानंतर गाडी मालक ओला घेऊन क्रॉफर्ड मार्केटला गेला. तिथे पोलीस आयुक्तांचं ऑफिस आहे. तिथे तो एका व्यक्तीला भेटला. ती व्यक्ती कोण? हा माझा प्रश्न आहे. हे जर काढलं तर सोपं आहे. ओलामध्ये बसून गेला त्याचा रेकॉर्ड आहे. ओलाच्या ड्रायव्हरने त्याला पाहिलंय, तो कोणाला भेटला हे पाहिलं आहे. अशा परिस्थितीत एवढे योगायोग कसे हे समजत नाही. वझे ठाण्यात राहणारे, ज्याची गाडी घरासमोर पार्क केली तोही ठाण्यात राहणारा, घटनेच्या कितीतरी दिवसांपूर्वी त्यांचं फोनवरुन संभाषण झालं आहे. म्हणजे ते एकमेकांना ओळखतात. खूप मोठे प्रश्न निर्माण झाले. ती गाडी दिसल्यावर पहिल्यांदा तिथे वाझे पोहोचले. स्थानिक पोलीस नाही, क्राईम पोलीस नाही तर ते पोहोचले. हे धमकीचं पत्र वाझेंनाच मिळालं, त्यांनीच तिथे डिलिव्हर केलं. मग त्यानंतर योगायोग पाहा. टेलिग्राम चॅनल तयार होतं. जैश-उल-हिंद नावाने पत्र दाखवलं जातं, जणू खंडणी मागण्याकरता हे करण्यात आलं. मात्र जैश-उल-हिंद म्हणतं हे आमचं पत्रच नाही. खूप मोठी शंका या प्रकरणात तयार झाली आहे. म्हणून माझी मागणी आहे, हे पुरावे शंकेला वाव देणारे आहेत. ही टेरर अॅक्टिव्हिटी आहे, कारण जिलेटिन होतं. जैश-उल-हिंदचं नावं आलेलं आहे, उडवून देण्याची धमकी आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी एनआयएकडे द्यावी. हे योगायोग काय आहेत, याची चौकशी एनआयएने करावी, अशी माझी मागणी आहे."

महत्वाच्या केसेस त्यांच्याकडेच का सोपवल्या जातात? मनसेचा सवाल मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, सचिन वाझे ह्यांनी 2008 साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ह्या प्रकरणाचा गूढ अधिकच वाढले आहे. सगळ्या महत्वाच्या केसेस त्यांच्याकडेच का सोपवल्या जातात??? तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात??? असा सवाल त्यांनी केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget