'भोंगा' चित्रपटाचं प्रदर्शन म्हणजे मनसेचा कमर्शिअल पब्लिसिटी स्टंट : किशोरी पेडणेकर
Kishori Pednekar on Bhonga Marathi Cinema : किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे की, भोंग्यांचा कमर्शियल ट्रेंडिंग स्टंट करण्यासाठी हे सगळं मनसेने केलं आहे. मनसेचा हा सगळा 100 टक्के पब्लिसिटी स्टंट होता.
Bhonga Marathi Cinema News : भोंगा या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण आज मनसे चित्रपटसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या हस्ते झाले. 3 मे रोजी चित्रपट रिलीज होणार आहे. दरम्यान चित्रपट प्रदर्शनाआधीच यावरुन वाद होतानाचे चित्र आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे की, 'भोंगा' चित्रपटाचं प्रदर्शन म्हणजे मनसेचा कमर्शिअल पब्लिसिटी स्टंट आहे. भोंग्याची पार्श्वभूमी मनसेने चांगली तयार केली. सामाजिक मग धार्मिक तेढ याद्वारे भोंग्याला चांगली प्रसिद्धी दिली. कमर्शियल काम कसा करता येईल हे मनसेकडून शिकावं, असं पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
3 तारखेला मिटिंग घेणार म्हणे मुंबईचे वातावरण यांनी तापवलं आणि तेवढ्यात हा भोंगा चित्रपट प्रदर्शित करत आहे. भोंग्यांचा कमर्शियल ट्रेंडिंग स्टंट करण्यासाठी हे सगळं मनसेने केलं आहे. मनसेचा हा सगळा 100 टक्के पब्लिसिटी स्टंट होता. भोंगा 2019 ला प्रदर्शित होणार होता. पण त्यावेळी लाव रे तो व्हिडिओ सुरु झाला होता, असंही पेडणेकर म्हणाल्या.
भोंगा या चित्रपटाची निर्मिती निर्माते, दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील, अर्जुन हिरामन महाजन, अमोल लक्ष्मण कागणे यांनी केली असून, या आशयघन चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी सांभाळली आहे. अभिनेत्री दिप्ती धोत्रे आणि अभिनेता कपिल कांबळे, श्रीपाद जोशी,अमोल कागणे, पवन वैद्य, आकाश घरत यांचाही अभिनय या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
आम्ही मातोश्रीसमोर छातीचा कोट करून उभे राहणार - पेडणेकर
राणा दाम्पत्यावर बोलताना पेडणेकर म्हणाल्या की, राणा हे बालिश आणि निंदनीय प्रकार करतात. ते दोघे अपक्ष उमेदवार आहेत. तुम्ही मुंबईत तेढ निर्माण करताय. शिवसैनिकांची डोकी भडकवण्याचा प्रयत्न करताय. दंगल कशी होईल हे घडण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. शिवसैनिक हे नेहमी जागृत असतात. हे डिवचत आहेत. दंगली घडवायच्या राष्ट्रपती राजवट आणायची हा सगळा यांचा डाव दिसतोय. आम्ही मातोश्री समोर छातीचा कोट करून उभे राहणार, असंही त्या म्हणाल्या. हे नीचगिरी करत असतील तर केंद्राने आणि राज्याच्या गृह विभागाने याची नोंद घ्यावी. सेक्युरिटी मिळाल्यापासून यांना जास्त जोर आलाय. मुंबई शांत ठेवा शिवसैनिकांची माथी भडकावू नका, असंही त्या म्हणाल्या.