एक्स्प्लोर

महापौर दालनात वास्तूशास्त्रानुसार बदल? दिशा नव्हे तर मुंबईकरांची दशा बदलण्यासाठीचा प्रयत्न : महापौर

मुंबई : महानगरपालिकेच्या नव्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या महापौर दालनात केलेले काही बदल सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. हे बदल वास्तूशास्त्रानुसार केले असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई : महानगरपालिकेच्या नव्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या महापौर दालनात केलेले काही बदल सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. अनेकजण घर किंवा नवी वास्तू घेताना वास्तूशास्त्राच्या नियमांचीही पडताळणी करतात. महापौर किशोरी पेडणेकर यांनीही महापालिकेतल्या महापौर दालनात वास्तूशास्त्राला अनुसरुन काही बदल केले असल्याचे बोलले जात आहे. मात्र, हे बदल दिशांसाठी नाही तर मुंबईकरांची दशा बदलण्यासाठी केले असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. महापौर दालनात काय बदल केले आहेत? 1. महापौरांनी आपल्या दालनाच्या जुन्या प्रवेशद्वारातून प्रवेश बंद करून बाजूच्या दरवाजाचा वापर सुरु केला आहे. दालनातील आसन व्यवस्थेतही बदल केले आहेत. 2. सध्याचा दालनाचा मुख्य दरवाजा बंद करुन त्याच्या बाजूचा दरवाजा उघडण्याचेही आदेश दिले आहेत. 3. उत्तर दिशेला तोंड करुन महापौरांचे आसन ठेवण्यात आले आहे. त्यामुळे दरवाजातून दालनात गेल्यानंतर डाव्या हाताला महापौरांकडे जावे लागते. 4. दालनातील डाव्या बाजूला असलेले मिटींग टेबल उजव्या बाजूला ठेवण्यात आले आहे. 5. महापौर दालनातील तीन मोठ्या खिडक्या उघडण्यात आल्या आहेत. 6. आसनव्यवस्थेसह दालनाबाहेरील महापौरांच्या नावाचा साधा नामफलक बदलून तेथे डिजिटल फलक लावण्यात आला आहे. 7. पालिकेच्या हेरिटेज इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर पालिका सभागृहाला लागूनच महपौरांचे दालन आहे. पूर्वी या दालनाच्या शेजारी पालिका चिटणीसांचेही दालन होते. कालांतरांने चिटणीसांना अन्य दालन उपलब्ध करुन देत महापौरांचे दालन भव्य करण्यात आले. 8. 1999 मध्ये हरेश्वर पाटील महापौर असताना महापौरांची खुर्ची दालनात गेल्यानंतर डाव्या हाताला होती. ही व्यवस्था पुढील काही काळ तशीच ठेवण्यात आली होती. 9. श्रद्धा जाधव यांच्या महापौरपदाच्या काळात सन 2009 मध्ये ही आसनव्यवस्था बदलली आणि दरवाजातून आत शिरल्यानंतर समोरच महापौरांची खुर्ची होती. विश्वनाथ महाडेश्वर महापौर होईपर्यंत ही आसनव्यवस्था तशीच होती. 10. किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती होताच त्यांनी खुर्ची व इतर आसनव्यवस्था बदलण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. या बदलांबाबत एबीपी माझाने महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी बातचित केली. यावेळी पेडणेकर म्हणाल्या की, महापौर दालनातील बदल हे वास्तूशास्त्रांप्रमाणे नाहीत तर हवा आणि प्रकाश खेळता राहण्यासाठी केले आहेत. तसेच वीजबचत हादेखील त्यामागचा एक उद्देश आहे. किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, महापौर दालनाची बैठकव्यवस्था वास्तूशास्त्राच्या नियमांप्रमाणे केली या चर्चा चूकीच्या आहेत. नव्या बैठकव्यवस्थेमुळे खिडक्या उघड्या ठेवता येतात. पंखा, दिवे लावण्याची आवश्यकता भासत नाही. एसीशिवाय दालनातील वातावरण थंड राहते. यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. पेडणेकर म्हणाल्या की, वास्तूशास्त्राचे नियम पाळायचे असते तर महापौरांच्या खुर्चीचे तोंड पूर्व दिशेकडे करणे गरजेचे होते. आम्ही तसे केलेले नाही. महापौर निवास्थानातही असे बदल करता आले असते. मी दिशा नाही भेटायला येणाऱ्या माणसांची दशा पारखते, म्हणून हे बदल केले आहेत. महापौर दालनाविषयी अधिक माहिती 1. आधीच्या महापौरांची खूर्ची दक्षिणमुखी असायची आता ती उत्तरमुखी करण्यात आली आहे. मात्र, महापौर दालनाचे प्रवेशद्वार दक्षिणमुखीच आहे. 2. आतापर्यंत सुनिल प्रभू, श्रद्धा जाधव, स्नेहल आंबेकर या महापौरांनीदेखील दालनातील रचना बदललेली आहे. 3. दालनात कोणीही नसतानादेखील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि अन्य बाबींसाठी दिवे लावले जायचे. 4. आता महापौर दालनातील मोठ्या तीन खिडक्या उघडल्याने पुरेसा प्रकाश असतो. 5. महापालिकेची वास्तू हेरिटेज आहे. त्यामुळे पुरेसा प्रकाश आणि हवा खेळती नसेल तर सागवानी लाकडाचे साहित्य, जूनी झुंबरे खराब होण्याची शक्यता असते.

महत्त्वाच्या बातम्या

नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget