एक्स्प्लोर
भुजबळ आणि शिवसेना नेत्यांचं एकाच कंपनीत मनी लाँडरिंग: सोमय्या
मुंबई: मनी लाँडरिंगप्रकरणी जेलमध्ये असेलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना नेत्यांनी एकाच कंपन्यांमधून मनी लाँडरिंग केल्याचा गंभीर आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. ते आज मुंबईत बोलत होते.
जर उद्धव ठाकरेंनी आपली संपत्ती घोषित केली तर हे सगळं बिंग फुटेल याची भीती ठाकरेंना असल्याचंही सोमय्यांनी म्हटलं आहे. ‘उद्धव ठाकरे स्वत:ची संपत्ती का जाहीर करत नाही? त्यांना एवढी कसली भीती वाटते?’ असं म्हणत सोमय्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
‘भुजबळ यांनी ज्या कंपन्यामधून मनी लाँडरिंग केलं. त्याच कंपन्यांमधून उद्धव ठाकरेंच्या सीएने सुद्धा मनी लाँडरिंग केलं आहे. इतकंच नाही तर शिवेसेनच्या नेत्यांनीही या कंपन्यांमधून मनी लाँडरिंग केलं आहे. या सगळ्या आरोपांना उद्धव ठाकरे उत्तर देऊ शकतील का?’ असे आरोप सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर केले आहेत.
उद्धव ठाकरेंचे सात कंपन्यांशी आर्थिक लागेबांधे, सोमय्यांचा आरोप
दरम्यान, याआधी किरीट सोमय्यांनी सात कंपन्यांची यादी जाहीर केली होती. या कंपन्यांशी उद्धव ठाकरेंचे लागेबांधे असल्याचा आरोप केला होता. यामुळे उद्धव ठाकरेंनी आपली संपत्ती जाहीर करावी, असं आव्हान सोमय्यांनी दिलं होतं.
किरीट सोमय्यांनी दावा केलेल्या सात कंपन्या :
संबंधित बातम्या:
सोमय्यांनी आधी अमित शाहांची संपत्ती जाहीर करावी: राहुल शेवाळे
उद्धव ठाकरेंनी संपूर्ण कुटुंबाच्या संपत्तीचं ऑडिट करावं: सोमय्या
जगमंद्री फिनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड
किम इलेक्ट्रॉनिक्स
जेपीके ट्रेडिंग
लेक्सस इंफोटेक
रिगलगोल्ड ट्रेंडिंग को-ऑपरेटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड
व्हॅनगार्ड ज्वेल्स लि.
यश ज्वेल्स लि.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement