एक्स्प्लोर

Kirit Somaiya Video : किरीट सोमय्यांना कथित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, 50 लाखांच्या खंडणीचा आरोप 

Kirit Somaiya Video : किरीट सोमय्या यांच्या कार्यालयात एक मेल आला होता. त्यामध्ये अज्ञाताने सोमय्यांना त्यांचा कथित अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. 50 लाख रुपये द्या अन्यथा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी देण्यात आली. 

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा कथित व्हिडीओ (Kirit Somaiya Video) पुन्हा चर्चेत आला आहे. कारण सोमय्यांकडे थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 50 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) तक्रार केली आहे. सोमय्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने सोमय्यांचा कथित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. 

किरीट सोमय्या यांच्या कार्यालयात एक मेल आला होता. त्यामध्ये अज्ञाताने सोमय्यांना त्यांचा कथित अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. 50 लाख रुपये द्या अन्यथा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी सोमय्यांना मेलवरुन देण्यात आली. 

नेमकं प्रकरण काय?  (Kirit Somaiya viral video case)

काही दिवसांपूर्वी एक अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ भाजप नेते किरीट सोमय्यांचा असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला होता. हाच कथित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, अज्ञात आरोपीने दिली. याप्रकरणी किरीट सोमय्यांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. 

किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम 385 अन्वये नवघर पोलीस ठाण्यात (navghar police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडीओने राज्यभर खळबळ

जुलै महिन्यात व्हायरल झालेल्या व्हिडीओने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. अश्लिल व्हिडीओतील व्यक्ती किरीट सोमय्या असल्याचा आरोप झाला होता. एक दोन नव्हे तर तब्बल 36 क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. (Kirit Somaiya Viral Video)  हा मुद्दा राज्याच्या विधिमंडळातही उपस्थित झाला होता. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत थेट पेनड्राईव्ह आणला होता. किरीट सोमय्या यांच्याशी संबंधित 8 तासांचे व्हिडीओ या पेनड्राईव्हमध्ये असल्याचा दावा त्यावेळी अंबादास दानवे यांनी केला होता. तसंच सोमय्यांनी धमकी देऊन महिलांचं शोषण केल्याचा आरोप दानवेंनी केला होता. 

सोमय्यांचं गृहमंत्र्यांना पत्र 

दरम्यान या प्रकरणानंतर किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं होतं. या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची सत्यता तपासून,चौकशी करावी, अशी मागणी स्वत: किरीट सोमय्या यांनी केली होती. 

फडणवीसांचं सभागृहात आश्वासन

दरम्यान, याप्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल, असं आश्वासन, स्वत: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. "हे प्रकरण गंभीर आहे. राजकारणात अनेक प्रसंग येतात. मला पुरावे द्या. आम्ही कोणालाही पाठिशी घालणार नाही. याप्रकरणाची सखोल चौकशी होईल. कोणतंही प्रकरण दाबलं जाणार नाही", अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली होती. 

संबंधित बातम्या 

Kirit Somaiya Video : किरीट सोमय्यांचा व्हिडीओ, दानवेंनी थेट पेन ड्राईव्ह आणला, विधानसभेतील राडा UNCUT

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 21 January 2024Special Report Donald Trump : नागरिकत्व ते मंगळवार स्वारी...निर्णयांचा धडाका; कशी असेल ट्रम्प सरकारची भविष्यातील वाटचाल?Special Report Walmik Karad CCTV : आवादा कंपनीला खंडणी मागितली 'त्या' दिवशीचं सीसीटीव्ही फुटेजSpecial Report Sanjay Shirsat VS Abdul Satta : शिरसाट विरुद्ध अब्दुल सत्तार वादाचा नवा अंक, पालकमंत्री शिरसाट आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
Embed widget