एक्स्प्लोर

Kirit Somaiya on Sujit Patkar Ed Raids : त्यांना उत्तर तर द्यावंच लागणार; सुजित पाटकरांवरील ईडी छापेमारीनंतर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया

Kirit Somaiya on Sujit Patkar: संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्यावर ईडीनं छापे मारले आहेत. त्यांना उत्तर तर द्यावंच लागणार, असं म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ईडी छाप्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Kirit Somaiya on Sujit Patkar Ed Raids : मुंबईतील (Mumbai News) कथित कोविड सेंटरमध्ये (BMC Covid Scam) कोट्यवधींची घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. याच प्रकरणाी आज सकाळपासून ईडीकडून (ED Raids) मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. मुंबईतील तब्बल 15 हून अधिक ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. अशातच संजय राऊत (Sanjay raut) यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्यासह बीएमसीचे वरिष्ठ अधिकारी,  पुरवठादार आणि शहरात कोविड मशिनरी उभारण्यास मदत करणाऱ्या लोकांच्या आणि इतरांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. अशातच मुंबईत होणाऱ्या ईडीच्या छापेमारीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्यावर ईडीनं छापे मारले आहेत. त्यांना उत्तर तर द्यावंच लागणार, असं म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ईडी छाप्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "कोविड काळात अनेक ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार झाला होता, त्यावरून कारवाई होत असेल." 

सुजित पाटकर यांच्या घरावर ईडीची छापेमारी 

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. सांताक्रूझ पूर्व वाकोला येथील सुमित अरिस्ता बिल्डिंगच्या सी विंगमध्ये सुजित पाटकर राहतात. ईडीच्या पथकानं आज सकाळी त्यांच्या याच निवासस्थानी छापेमारी करण्यास सुरुवात केली. ईडीचे 6 ते 7 अधिकारी सकाळी 8 वाजता सुजित पाटकर यांच्या घरी आले. सुमारे 3 तास चाललेल्या छाप्यानंतर ईडीचं पथक सकाळी 10.45 वाजता सुजित पाटकर यांच्या निवासस्थानाहून निघून गेलं. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सुजित पाटकर यांच्यावर कोविड सेंटरमध्ये घोटाळा केल्याचा आरोप आहे. 

संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर नेमके कोण? 

बीएमसी कोविड घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांनी आरोप केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं होतं. आज याप्रकरणी ईडीनं मुंबईत तब्बल 15 ठिकाणी छापेमारी केली होती. या आरोपांना संजय राऊत यांनी ते माझे फक्त मित्र असल्याचं म्हटलं होतं.ईडीच्या चौकशीत सुजीत पाटकरांच्या घरी अलिबागच्या जमिनीच्या व्यवहाराचे पेपर मिळाले होते. ज्या व्यवहारात पाटकरांची पत्नी आणि वर्षा राऊतांची नावं होती. लाईफसायन्सेस हॉस्पिटल अँड मॅनेजमेंट या फर्ममध्ये मी भागीदारांपैकी एक आहे. परंतु कंपनी डॉ. हेमंत गुप्ता यांच्या मालकीची आहे आणि वरळी येथील त्यांच्या क्लिनिकच्या नावावर ती नोंदणीकृत आहे, असं सुजित पाटकर म्हणाले होते.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

ED Raid in Mumbai : BMC कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीची छापेमारी; संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्या मालमत्तांवरही छापेमारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sheikh Hasina : तिकडं बांगलादेशकडून पासपोर्ट रद्द, गुन्ह्यांवर गुन्हे अन् वॉरंटही जारीचा खेळ सुरुच; इकडं भारताचा सुद्धा शेख हसीनांसाठी तगडा निर्णय!
तिकडं बांगलादेशकडून पासपोर्ट रद्द, गुन्ह्यांवर गुन्हे अन् वॉरंटही जारीचा खेळ सुरुच; इकडं भारताचा सुद्धा शेख हसीनांसाठी तगडा निर्णय!
वाल्मिक कराड आका, आकाचा आका धनंजय मुंडे; तर सुरेश धसांनी उल्लेख केलेली राष्ट्रवादीतील बडी मुन्नी कोण?
वाल्मिक कराड आका, आकाचा आका धनंजय मुंडे; तर सुरेश धसांनी उल्लेख केलेली राष्ट्रवादीतील बडी मुन्नी कोण?
Sarangi Mahajan on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी माझी जमीन बळकावली;सारंगी महाजनांचा गंभीर आरोप
Sarangi Mahajan on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी माझी जमीन बळकावली;सारंगी महाजनांचा गंभीर आरोप
Sunil Tatkare : शरद पवारांचे 7 खासदार फोडताय का? सुनील तटकरे म्हणाले, दिल्लीत खासदारांची भेट पण...
शरद पवारांचे 7 खासदार फोडताय का? सुनील तटकरे म्हणाले, दिल्लीत खासदारांची भेट पण...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 08 January 2025Sandeep Kshirsagar : Walmik Karadला पोलीस स्टेशनमध्ये VIP ट्रीटमेंट सुरु;संदीप क्षीरसागर आक्रमकRohit Pawar Full PC : नैतिकता म्हणून राजीनामा द्यायला हवा, रोहित पवारांचा रोख कुणावर?Sarangi Mahajan on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी माझी जमीन बळकावली;सारंगी महाजनांचा गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sheikh Hasina : तिकडं बांगलादेशकडून पासपोर्ट रद्द, गुन्ह्यांवर गुन्हे अन् वॉरंटही जारीचा खेळ सुरुच; इकडं भारताचा सुद्धा शेख हसीनांसाठी तगडा निर्णय!
तिकडं बांगलादेशकडून पासपोर्ट रद्द, गुन्ह्यांवर गुन्हे अन् वॉरंटही जारीचा खेळ सुरुच; इकडं भारताचा सुद्धा शेख हसीनांसाठी तगडा निर्णय!
वाल्मिक कराड आका, आकाचा आका धनंजय मुंडे; तर सुरेश धसांनी उल्लेख केलेली राष्ट्रवादीतील बडी मुन्नी कोण?
वाल्मिक कराड आका, आकाचा आका धनंजय मुंडे; तर सुरेश धसांनी उल्लेख केलेली राष्ट्रवादीतील बडी मुन्नी कोण?
Sarangi Mahajan on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी माझी जमीन बळकावली;सारंगी महाजनांचा गंभीर आरोप
Sarangi Mahajan on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी माझी जमीन बळकावली;सारंगी महाजनांचा गंभीर आरोप
Sunil Tatkare : शरद पवारांचे 7 खासदार फोडताय का? सुनील तटकरे म्हणाले, दिल्लीत खासदारांची भेट पण...
शरद पवारांचे 7 खासदार फोडताय का? सुनील तटकरे म्हणाले, दिल्लीत खासदारांची भेट पण...
Commenting on Women Figures : महिलांच्या फिगरवर कमेंट करणे गुन्हाच! मेसेजमध्ये सतत सेक्शुअल कमेंट करणाऱ्या अधिकाऱ्याला उच्च न्यायालयाचा झटका
महिलांच्या फिगरवर कमेंट करणे गुन्हाच! मेसेजमध्ये सतत सेक्शुअल कमेंट करणाऱ्या अधिकाऱ्याला उच्च न्यायालयाचा झटका
Pune News: वंशाच्या दिव्यासाठी सरकारी नोकरीवर पाणी? पिंपरी पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर कारवाई, हाती दिला नारळ, पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय!
वंशाच्या दिव्यासाठी सरकारी नोकरीवर पाणी? पिंपरी पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर कारवाई, हाती दिला नारळ, पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय!
VIDEO Sarangi Mahajan : पंकजा-धनंजयने जमीन हडपली, वाल्मिकच्या माणसांनी धमकी दिली; प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजनांचा आरोप
पंकजा-धनंजयने जमीन हडपली, वाल्मिकच्या माणसांनी धमकी दिली; प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजनांचा आरोप
Sam Konstas : मिशाही न फुटलेल्या काॅन्स्टासला धक्का देताच राडा, दंडही झाला, आता त्याच काॅन्स्टासकडून कोहलीचं 'विराट' कौतुक! दोघांमध्ये काय बोलणं झालं ते सुद्धा सांगितलं
मिशाही न फुटलेल्या काॅन्स्टासला धक्का देताच राडा, दंडही झाला, आता त्याच काॅन्स्टासकडून कोहलीचं 'विराट' कौतुक! दोघांमध्ये काय बोलणं झालं ते सुद्धा सांगितलं
Embed widget