(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kirit Somaiya : उद्धव ठाकरे भगवे उतरवून हिरवे झालेत, म्हणून त्यांना मशिदीच्या भोंग्यांची काळजी; किरीट सोमय्यांची टीका
Kirit Somaiya on CM Uddhav Thackeray : सोमय्या यांनी म्हटलं आहे की, उद्धव ठाकरे अडचणीत आले आहेत. भगवे उतरवून हिरवे झाले आहे. म्हणून त्यांना मशिदीच्या भोंग्यांची काळजी आहे.
Kirit Somaiya on CM Uddhav Thackeray : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भोंग्याच्या मुद्द्यावरुन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. सोमय्या यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे की, ध्वनी प्रदूषणाच्या नावावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी मेट्रो करशेडची वाट लावली. मग आता ज्या धर्माच्या नावावर सकाळी 4 वाजता पासून एवढ्या डेसिबलचे भोंगे चालू का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी म्हटलं आहे की, उद्धव ठाकरे अडचणीत आले आहेत. भगवे उतरवून हिरवे झाले आहे. म्हणून त्यांना मशिदीच्या भोंग्यांची काळजी आहे.
सोमय्या म्हणाले की, ज्यावेळी योग्य परिस्थिती होत असते. पंतप्रधान मोदी यांनी ती स्थिती निर्माण केली. म्हणून 370 गेले, बाबरी मशिदीच्या जाग्यावर राम मंदिर निर्माण झालं. योगी सरकारने नियम केले, पहाटेची अजान बंद होणार. अजान करा पण लाऊडस्पीकरची गरज काय? असं झाल्यास देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंची काही गरज नाही. उद्धव ठाकरेंनी हिरवे हातात घेतल्याने ही शरणागती पत्करली आहे, असं सोमय्या म्हणाले.
सोमय्या म्हणाले की, गणेश विसर्जन मिरवणूक दहानंतर लाऊड स्पीकर बंद होतो. ज्या धार्मिक स्थळांवर अधिकृत भोंगे आहेत, त्यांचे डेसिबल कंट्रोल करा, जे अनधिकृत आहे ते काढा. हिंदू सणांवर का हे नियम आहेत? नियम मला मान्य आहेत, असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे, शिवसेनेची आता टरकली आहे. अनधिकृत भोंगे कुठे आहेत, तिथे त्यांची जाण्याची हिम्मत नाही. तिथे गेले तर खुर्ची जाणार, तिथे गेले तर वसुली बंद होणार, अशी टीकाही त्यांनी केली.
ते म्हणाले की, मला राजकीय पक्षांवर बोलायचे नाही. हनुमान चालीसा बोलणारांना देशद्रोही बोललं जातं. मग पहाटे वाजणाऱ्या भोंग्यांवर आयुक्त संजय पांडे कारवाई का करत नाहीत, असं ते म्हणाले. भाजप आधीपासून धर्म, संस्कृतीच्या रक्षणसाठी योग्य वेळी पुढं असते, असं ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या