BJP vs Shiv Sena LIVE : राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर 29 एप्रिलला जामीनावर सुनावणी

Kirit somaiya Maharashtra Mumbai Latest News Updates : आज महाराष्ट्र आणि मुंबईच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा दिवस आहे. याचं कारण आहे भाजप आणि शिवसेनेत काल झालेला भीषण राडा.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Apr 2022 11:22 PM
खासदार नवनीत राणा यांची तब्येत खालावली

14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर खासदार नवनीत राणा यांना भायखळा तुरुंगात नेण्यात आले. यामध्येच आता नवनीत राणा यांची तब्येत खालावली असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या त्यांना भायखला कारागृहाच्या रुग्णालयात दाखल असल्याची माहीती आहे. थोड्याच वेळात त्यांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्याची शक्यता आहे.

किरीट सोमय्या सोवमारी केंद्रीय गृहमंत्र्यांची घेणार भेट

शनिवारी झालेल्या घटनेवरून भाजप नेते किरीट सोमय्या सामोवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहोत. यावेळी त्यांच्यासोबत भाजप आमदार मंगल प्रभात लोढा, मिहीर कोटेचा, आशिष शेलार आणि मनोज कोटक हे महत्वाचे नेते देखील उपस्थित असणार आहे. 

राष्ट्रपती राजवट लावली तर राज्यातील जनता पेटून उठेल--जयंत पाटील

विरोधकांचे आता सगळे उपाय थकले त्यामुळे आता राष्ट्रपती राजवट लावायची असा त्यांचा प्रयत्न दिसतोय पण असं केलं तर महाराष्ट्रातील जनता पेटून उठेल असे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं. ज्यांच्या पुढाकाराने हे चालू आहे त्यांच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरेल असेही त्यांनी म्हटलंय.

राणा दाम्पत्याविरोधात सरकारी पक्ष 27 एप्रिलला युक्तीवाद करणार, लेखी म्हणणं मांडणार : सरकारी वकील प्रदीप घरत

राणा दाम्पत्याच्या जामिनावर 29 एप्रिलला सुनावणी, तातडीनं सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार

राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पोलीस कोठडीची मागणी कोर्टानं फेटाळली

राणा दाम्पत्याच्या घराबाहेर गोंधळ घालणाऱ्या 4 शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात

अमरावतीत राणा यांच्या निवासस्थानी युवा स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांचे होमहवन..

काल आमदार रवी राणा यांच्या अमरावती मधील गंगा सावित्री निवासस्थानी शिवसैनिकांनी जिथे आंदोलन केले होते त्या जागेचे शुध्दीकरण आज युवा स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे...खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांनी शिवसेनेला हींदुत्वाची जाणीव करून देण्याकरीता मातोश्री बाहेर हनुमान चालिसा पठन करण्याचे ठरविले होते, मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सुडबुध्दीने कारवाई करून राणा दांपत्याला मातोश्रीवर जाण्यापासुन रोखले. यामुळे बाळासाहेबांच्या आत्म्याला तीव्र वेदना झाल्या असाव्यात याच भावनेने आम्ही आज होम हवन करीत आहोत, असं युवा स्वाभीमानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

राणा दाम्पत्याच्या रिमांडवर सुनावणी सुरू, FIRचं सरकारी वकिलांकडून वाचन, वांद्रे न्यायालयात युक्तिवाद सुरु

राणा दाम्पत्याच्या रिमांडवर सुनावणी सुरू, FIRचं सरकारी वकिलांकडून वाचन, वांद्रे न्यायालयात युक्तिवाद सुरु

किरीट सोमय्या हे केवळ डायलॉगबाजी करत असून ते शक्ती कपूर आहेत- चंद्रकांत खैरे

किरीट सोमय्या हे केवळ डायलॉगबाजी करत असून ते शक्ती कपूर आहेत अशी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केलीय.सोमय्या वर हल्ला झाला तर त्याना 10 ठिकाणी फिरायची गरज काय असा सवाल करत सोमय्या यांना स्टंटबाजी करायची सवय असल्याची टीका देखील त्यांनी केलीय, यावेळी विकास कामाच्या श्रेयावरून खैरे यांनी भागवत कराड अजून नवीन आहेत त्यांना काय कळत म्हणत अर्थराज्यमंत्री  कराड यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं...

अॅड रिझवान मर्चंट आण अॅड वैभव कृष्णा हे वकील रवी राणा आणि नवनीत राणांची बाजू मांडणार, थोड्यात वेळात सुनावणी 

अॅड रिझवान मर्चंट आण अॅड वैभव कृष्णा हे वकील रवी राणा आणि नवनीत राणांची बाजू मांडणार, थोड्यात वेळात सुनावणी 

औरंगाबाद ते पुणे नवीन द्रुतगती महामार्गाची नितीन गडकरींकडून घोषणा, 10 हजार कोटींचा खर्च अपेक्षित

औरंगाबाद ते पुणे नवीन द्रुतगती महामार्गाची नितीन गडकरींकडून घोषणा, 10 हजार कोटींचा अपेक्षित खर्च..


औरंगाबाद ते पुणे प्रवास सव्वा तासात प्रवास पूर्ण होणार...
या रोडवर 140 किमी वेगाने प्रवासी वाहने जाऊ शकतील...

असं झुंडशाहीचं राज्य कधी पाहिलं नाही पण आम्ही जशास तसं उत्तर देऊ शकतो- देवेंद्र फडणवीस

पोलिसांचं या हल्ल्याला समर्थन आहे असं दिसतंय किंवा पोलिस इतके नाकाम झालेत की असा हल्ला होणार आहे हे माहित असून ते रोखू शकले नाहीत. पोलिस झेड प्रोटेक्टी असलेल्या किरीट सोमय्यांसोबत अशी हयगय करणं चुकीचं आहे. त्यामुळं पोलिसांवर कारवाई करावी अन्यथा उद्या कुणीही सुरक्षित राहणार नाही. पोलिसांसमोर दगड मारला गेला, त्यानंतर एफआयआर घ्यायलाही भीती वाटते. राज्य कुणाचं आहे, असं झुंडशाहीचं राज्य कधी पाहिलं नाही पण आम्ही जशास तसं उत्तर देऊ शकतो. मुंबई पोलिसांच्या इतिहासातील लाजिरवाणा काळ सुरु आहे. 

Ravi Rana And Navneet Rana Updates : आमदार रवि राणा आणि खासदार नवनीत राणांकडून कोठडीत रात्रभर 101 वेळा हनुमान चालीसाचे पठण

Ravi Rana And Navneet Rana Updates : आमदार रवि राणा आणि खासदार नवनीत राणांकडून कोठडीत रात्रभर 101 वेळा हनुमान चालीसाचे पठण

 तपासाची गरज आहे, त्यासाठी राणा दाम्पत्याच्या पोलिस कोठडीची मागणी करणार, सरकारी वकील प्रदीप घरत 

 तपासाची गरज आहे, त्यासाठी राणा दाम्पत्याच्या पोलिस कोठडीची मागणी करणार, सरकारी वकील प्रदीप घरत 

भाजप म्हणून आम्ही सोमय्या यांच्याबरोबर आहोत. असे नामर्दांसारखे हल्ले करणं चूक - नितेश राणे

भाजप म्हणून आम्ही सोमय्या यांच्याबरोबर आहोत. असे नामर्दांसारखे हल्ले करणं चूक. पोलिसांना सोबत घेऊन हल्ला केला. नवीन शिवसेना आहे ही बाळासाहेबांची शिवसेना नाही- नितेश राणे

सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्यानंतर नितेश राणे भेटीला

काल किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्यानंतर आज नितेश राणे त्यांना भेटायला आले आहेत, ही एक सदिच्छा भेट असल्याची माहिती

Dilip Walse Patil Live : किरीट सोमय्या यांना जाण्याची गरज नव्हती. तिथं वकिलांनी जायला हवे होते सोमय्यांनी नाही - गृहमंत्री वळसे पाटील

Dilip Walse Patil Live : कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण केला जातोय. माहितीच्या आधारे राणा दाम्पत्याला अटक केली, असं गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले. किरीट सोमय्या यांना जाण्याची गरज नव्हती. तिथं वकिलांनी जायला हवे होते सोमय्यांनी नाही, असंही ते म्हणाले.

नवनीत राणा आणि रवी राणा वांद्रे कोर्टात पोहोचले, थोड्यात वेळात जामीन की कोठडी? यावर फैसला

नवनीत राणा आणि रवी राणा वांद्रे कोर्टात पोहोचले, थोड्यात वेळात जामीन की कोठडी? यावर फैसला

राणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, राणांना घेऊन पोलीस कोर्टाकडे रवाना

LIVE UPDATES #BreakingNews : राणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, राणांना घेऊन पोलीस कोर्टाकडे रवाना

उस्मानाबाद - आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात तक्रार

उस्मानाबाद - आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात तक्रार


शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मुंडे यांच्यासह 4 जणांनी दिली गुन्हा नोंद करण्याची तक्रार


मुख्यमंत्री यांचा एकेरी उल्लेख करून अपशब्द वापरले व दोन समाजात तेढ निर्माण करून तणावाचे वातावरण निर्माण करीत राज्याचे कायदा सुव्यवस्था बिगडविल्याचा आरोप


शिवसैनिकाच्या भावना दुखाविल्याने राणा दामपत्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी

Kirit Somaiya Live : माझ्या गाड्या निघाल्यावर त्यांना गुंडांच्या हवाले केले गेले

किरीट सोमय्या : काल झालेला हल्ला हा ठाकरे सरकार स्पॉन्सर हल्ला होता. मी पोहोचण्याआधी 70-80 शिवसैनिक पोहोचले होते. येताना मला शिवीगाळ केली गेली, पोलिसांनी स्वतः व्यवस्था केली होती, माझ्या गाड्या निघाल्यावर त्यांना गुंडांच्या हवाले केले गेले. याला आयुक्त संजय पांडे जबाबदार आहेत.

Kirit Somaiya Live : काल माझ्यावर झालेला हल्ला ठाकरे सरकारकडून स्पॉन्सर्ड : किरीट सोमय्या

Kirit Somaiya Live : काल माझ्यावर झालेला हल्ला ठाकरे सरकारकडून स्पॉन्सर्ड : किरीट सोमय्या

राणा दाम्पत्यांच्या घराबाहेर गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल





राणा दाम्पत्यांच्या घराबाहेर गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल, 

 

अज्ञात लोकांविरुद्ध खार पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय

 

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी काल खार पोलीस ठाण्यात तक्रार केली होती 

 

आयपीसी १४३, १४५, १४७, १४९ आणि ३७ (अ) आणि मुंबई पोलीस कायद्यान्वये अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल

 

नवनीत राणा यांच्याविरोधात देखील सरकारी कामात अडथळ्याप्रकरणी ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल 

 

राणा दाम्पत्यांविरोधात दोन गुन्हे तर अज्ञातलोकांविरोधात १ गुन्हा खार पोलिस स्थानकात दाखल


 

 



 


राणा दांपत्‍याला सांताक्रुझ पोलीस स्टेशनला ठेवलं

 राणा दांपत्‍याला सांताक्रुझ पोलीस स्टेशनला ठेवलं आहे. अकरा वाजेच्या दरम्यान सांताक्रुझ पोलीस स्टेशनहून त्यांना बाहेर काढतील. सुरक्षेच्या कारणास्तव मध्यरात्री खार पोलीस स्टेशनहून राणा दाम्पत्याला सांताक्रुझ पोलिस स्टेशनमध्ये आणले आहे

राणा दांपत्याला सकाळी 11 वाजता वांद्रे महानगर दंडाधिकारी कोर्टात हजर करणार

राणा दांपत्याला सकाळी 11 वाजता वांद्रे महानगर दंडाधिकारी कोर्टात हजर करणार


या कलमांखाली आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवलं जाण्याची शक्यता अधिक


त्यानंतर कोर्टात दोघांच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल

शिवसेनेच्या 100 गुंडांनी माझ्यावर हल्ला केला. मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला- किरीट  सोमय्या

किरीट  सोमय्या यांनी मुंबई पोलीस माझा FIR घेत नाहीत, त्यांनी माझ्या नावाने खोटा FIR लिहिला असल्याचा आरोप मुंबई पोलिसांवर केला आहे. तर पोलिसांवर मुख्यमंत्रांचा दबाव असल्याची टीका सोमय्यांनी केली. हा मला जीवे मारण्याचा तिसरा प्रयत्न आहे. आधी वाशीम नंतर पुणे आणि आता मुंबईत. 50 पोलिस असताना शिवसेनेच्या 100 गुंडांनी माझ्यावर हल्ला केला. मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिस आयुक्त काय करत आहेत? इतक्या प्रमाणात शिवसेनेचे लोक पोलिस स्टेशन परिसरात कसे आले? असे प्रश्न किरीट सोमय्या यांनी केले आहेत.





Kirit Somaiya News : भाजप नेते किरीट सोमय्यांची 10 वाजता पत्रकार परिषद

सोमय्यांवर दगडफेक कोणी केली याची चौकशी सुरू -दिलीप वळसे पाटील 

दिलीप वळसे पाटील  - 


- पोलिसांना वेगळे आदेश देण्याचे गरज नाही 
- पोलिसांनी त्यांचे काम केले पाहिजे
- राष्ट्रपती राजवट मागणी अजून केलेली नाही कोणी पण प्रयत्न सुरू आहे
- सोमय्यांवर दगडफेक कोणी केली याची चौकशी सुरू 
- राणांबाबतही चौकशी सुरू

किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून आम्ही FIR दाखल केला- पोलिस उपायुक्त मंजुनाथ सिंगे

पोलिस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी म्हटलं आहे की, किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून आम्ही FIR दाखल केला आहे. त्यानुसार पुढील तपास केला जाईल.

kirit Somaiya : पोलिसांवर मुख्यमंत्रांचा दबाव, माझ्या नावाने खोटा FIR लिहिला; सोमय्यांनी केले गंभीर आरोप

kirit Somaiya Maharashtra Mumbai Latest News Updates : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर काल हल्ला झाल्यानंतर दोन्ही पक्षांतला संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.राणा दाम्पत्याच्या अटकेच्या प्रकरणात आता किरीट सोमय्यांच्या एन्ट्रीनंतर वाद अधिकच चिघळला. किरीट सोमय्या खार पोलिस स्टेशनला पोहोचताच शिवसैनिकांनी गोंधळ केला.पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर शिवसैनिकांनी सोमय्यांच्या कारवर चपला फेकल्या. 


शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्यांचा वांद्रे पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला. यावेळी सोमय्या यांनी मुंबई पोलीस माझा FIR घेत नाहीत, त्यांनी माझ्या नावाने खोटा FIR लिहिला असल्याचा आरोप मुंबई पोलिसांवर केला आहे. तर पोलिसांवर मुख्यमंत्रांचा दबाव असल्याची टीका सोमय्यांनी केली. हा मला जीवे मारण्याचा तिसरा प्रयत्न आहे. आधी वाशीम नंतर पुणे आणि आता मुंबईत. 50 पोलिस असताना शिवसेनेच्या 100 गुंडांनी माझ्यावर हल्ला केला. मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिस आयुक्त काय करत आहेत? इतक्या प्रमाणात शिवसेनेचे लोक पोलिस स्टेशन परिसरात कसे आले? असे प्रश्न किरीट सोमय्या यांनी केले आहेत.

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी बाटल्या, चपला फेकल्या

राणा दाम्पत्याची भेट घ्यायला गेलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. किरीट सोमय्या परत जाताना त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी बाटल्या आणि चपला फेकल्याची घटना घडली आहे. 

 मुंबई पोलीस राज्य सरकारच्या दबावात काम करत आहे ; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

हल्ला होणार असे ट्विट किरीट सोमय्या यांनी करूनही पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. मुंबई पोलीस हे राज्य सरकारच्या दबावात काम करत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

ठोकशाहीला ठोकशाहीनेच उत्तर देऊ ; भाजप नेते आशिष शेलार यांचा इशारा  

 



भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला प्राणघातक हल्ला आहे. अशा प्रकारे राज्य चालवणे अपेक्षित नाही. त्यामुळे ठोकशाहीला ठोकशाहीनेच उत्तर देऊ अशा इशारा भाजप नेते आशिष शेलार यांनी दिला आहे. 


पार्श्वभूमी

Maharashtra Mumbai Latest News Updates : आज महाराष्ट्र आणि मुंबईच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा दिवस आहे. याचं कारण आहे भाजप आणि शिवसेनेत काल झालेला भीषण राडा. काल झालेल्या गोंधळानंतर राणा दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याआधी राणांनी पंतप्रधानांचा दौरा असल्यानं आंदोलन वापस घेत असल्याचं सांगितलं. मात्र नंतर त्यांना अटक केल्यानं गोंधळ वाढला. भाजप नेते किरीट सोमय्या राणा दाम्पत्याला भेटायला गेले आणि तिथं शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशात आज पंतप्रधान मोदी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळं भाजप-शिवसेनेतील गोंधळ आणि पंतप्रधानांचा दौरा याकडे आज दिवसभर लक्ष लागून असणार आहे. 


राणा दाम्पत्याला अटक, आज कोर्टात हजर करणार
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर खार पोलिसांनी त्यांना शनिवारी अटक केली.    त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्राचं वातावरण चांगलंच तापलं आहे. 


'मातोश्री'वर हनुमान चालिसा पठण करण्याची भूमिका राणा दाम्पत्याने मागे घेतली. परंतु या वादावर पडदा न पडता त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला त्यांच्या घरातून अटक केली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटक करण्यात आली. 


किरीट सोमय्यांच्या गाडीवर हल्ला, आज काय पडसाद उमटणार
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शनिवारी शिवसैनिकांनी हल्ला केला. या प्रकरणी आता शिवसेना आणि भाजप आमने-सामने आले असून आज दिवसभर यावर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकाच कार्यक्रमात
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून आज संध्याकाळी मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित दिसणार आहेत. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज एका मंचावर एकत्र दिसणार आहेत.  स्वर कोकिळा लता मंगेशकर यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 80 व्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित केले जाईल. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.