मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Elections 2024) चे बिगुल अखेर वाजले आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सामना रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून जागा वाटपावर चर्चा सुरु असून काही जागांवर तिढा निर्माण झाला आहे. त्यातच आमचा 85-85-85 जागांचा फॉर्म्युला ठरला आहे. 270 जागांवर आमचे एकमत झालं आहे. उरलेल्या जागा मित्रपक्षांना देणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली होती. आता महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी महाविकास आघाडीला डिवचले आहे.  


संजय निरुपम म्हणाले की, महाविकास आघाडीत सीट शेअरिंग वरून काल गोंधळ झाला. त्यांनी महाराष्ट्राला एक नवीन गणित सांगितले आहे. 85 + 85 + 85 = 270 असे ते म्हणत आहे. दोन्ही पक्षांनी काँग्रेसला उल्लू बनवले आहे. उबाठा आणि काँग्रेसमध्ये 100 पेक्षा अधिक जागा वरून मारामारी सुरु आहे. काँग्रेसला उबाठाने मोठा धक्का दिला आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.


तिन्ही पक्ष एकमेकांविरोधात षडयंत्र करताय 


उबाठाचे प्रवक्ते सांगतात की, आम्ही सेंच्युरी गाठणार म्हणजे ते काँग्रेसला 85 वर अडकवणार का? असा सवाल देखील संजय निरुपम यांनी उपस्थित केला. उबाठा भाजपसोबत असताना त्यांना 140 पेक्षा अधिक जागा मिळायच्या. आता त्यांना 100 पर्यंत जायला अवघड झालंय. तिन्ही पक्ष एकमेकांविरोधात षडयंत्र करत आहेत. सीट शेअरिंग नंतर यांच्यात पुढे भांडण होणार आहे. काँग्रेसचे आमदार कमी करण्यासाठी उबाठा गटाकडून प्रयत्न होणार आहेत. 


विरोधी पक्षनेता कोणाचा करायचा? यावरून भांडण


लोकसभेला काँग्रेस आणि एनसीपीचा स्ट्राइक रेट अधिक होता. तो आता कमी करण्यासाठी ठाकरे गट प्रयत्न करणार आहे. जे आघाडी सांभाळू शकत नाही ते महाराष्ट्र कसे सांभाळणार? त्यांना महाराष्ट्राची काळजी नाही. त्यांना खुर्चीची काळजी आहे. मात्र महाराष्ट्रात त्यांची सत्ता येणार नाही. विरोधी पक्षनेता कोणाचा करायचा? यावरून आता तिघात भांडण सुरु होणार आहे. असा टोला देखील संजय निरुपम यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Shivdi Vidhan Sabha: मोठी बातमी: शिवडी विधानसभेतून भाजपचा ठाकरे गटाविरोधातील उमेदवार ठरला? निष्ठावंताच्या मुलाला उमेदवारी


Video : प्रचारासाठी अजित दादांनी शक्कल लढवली! AI चा वापर करून लाडक्या बहिणींना साद; 53 सेकंदांचा व्हिडीओ पाहाच