एक्स्प्लोर
Advertisement
इमारतीच्या जिन्यावरुन चिमुरडीला पळवण्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद, आरोपी गजाआड
इमारतीच्या जिन्यावरून एका 9 वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना इमारतीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
मुंबई : भिवंडी शहरात लहान मुलांच्या अपहरणाच्या घटना वाढतच आहेत. शहरातील जैतुनपुरा परिसरातील एका इमारतीच्या जिन्यावरून एका 9 वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना इमारतीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. अकील अहमद मोहम्मद मुस्तकीन (वय 30) (रा. कापतलाव, भिवंडी) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला काही तासांतच अटक करण्यात आली आहे.
इमारतीमध्ये राहणाऱ्या एका रहिवाशाच्या सतर्कतेमुळे हा नराधम त्या मुलीला तेथेच टाकून पळून गेला. ही धक्कादायक घटना भिवंडी शहरातील जैतुनपुरा परिसरातील एका इमारतीच्या जिन्यावर घडली आहे. याप्रकरणी चिमुरडीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अपहरण आणि विनयभंगासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित चिमुरडी दुपारच्या सुमारास इमारतीखाली असलेल्या दुकानात पाव खरेदी करण्यासाठी गेली होती. ती घरी परतत असताना आरोपी अकील याने तिच्या पाठीमागून येऊन तिचे तोंड दाबले. त्यानंतर आरोपी तिचे अपहरण करीत इमारतीतून घेऊन जात होता. यावेळी इमारतीमध्ये राहणार्या एका महिलेला येताना पाहून त्याने पीडित मुलीला टाकून घटनास्थळावरून पळ काढला.
व्हिडीओ पाहा
पीडित चिमुरडी घरी रडत आल्याने घरच्यांनी तिची चौकशी केली असता, हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी भिवंडी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. यावर पोलिसांनी नराधमाविरोधात कलम 363, 366 (आ), 506, 511 आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर काही तासामध्ये पोलिसांनी गुन्हेगाराला अटक केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement