एक्स्प्लोर

Karnala Bank Scam : शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आणि कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांना ईडीकडून अटक

Karnala Bank Scam : शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आणि कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांना ईडी (ED) कडून अटक करण्यात आली आहे. कर्नाळा सहकारी बॅंकेचे (Karnala Nagari Sahakari Bank) गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

नवी मुंबई : शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आणि कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. कर्नाळा बँकेत 512 कोटी रूपयांच्या घोटाळ्या प्रकरणी विवेक पाटील मुख्य आरोपी असल्याची माहिती मिळत आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी 17 संचालकांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्र गृह खातं कर्नाळा बँक प्रकरणात चौकशी करण्यात चालढकल करीत असल्याने अखेर पनवेल भाजप आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण भाजप आमदार महेश बालदी यांच्याकडून ईडीकडे मार्च 2020 रोजी लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर ईडीनं याप्रकरणी तपसा सुरु केला. चौकशी अंती अखेर विवेक पाटील यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.

कर्नाळा बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा उघडकीस आले होते. त्यानंतर बँकेच्या व्यवहारांवर मर्यादा आली होती. यामुळे ठेवीदार आणि बॅंक खातेदारांचे पैसे पर मिळावे, यासाठी पनवेल मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी खातेदार आणि ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला होता. बँकेच्या विरोधात ठेवीदारांसोबत आंदोलनही केले होते. तसेच गुन्हे दाखल होऊनही ठेवीदारांच्या पैशांबाबत कुठलीही हालचाल दिसत नाही, म्हणून आम्ही ईडी कार्यलयात गेलो होतो. ठेवीदारांचे कष्टाचे पैसे परत मिळावे, हाच आमचा उद्देश आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही. पण यात खूप मोठे मनी लॉड्रिंग झाले आहे, असा आरोप प्रशांत ठाकूर यांनी याप्रकरणी केला होता. 

दरम्यान, विवेक पाटील यांच्या मालमत्तेवर या आधीच टाच आणण्यात आली होती. त्यांच्या गाड्यादेखील जप्त करण्यात आल्या होत्या. सहकार खात्यामार्फत या गैरव्यवहाराची चौकशी गेल्या 2 वर्षांपासून होती. शेतकरी कामगार पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असल्याने त्यांना वाचवले जात होते, असा आरोप भाजपकडून वारंवार करण्यात येत होता.

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेत 1 हजार कोटी रुपयांचा घोटाळा, भाजप नेत्यांचा आरोप 

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेत 1 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. माजी आमदार आणि बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी हा घोटाळा केल्याचा आरोपही सोमय्या केला होता.

सहकार खात्याने आणि रिझर्व्ह बॅंकेने या बँकेचे ऑडिट केले त्यावेळी कोट्यवधी रुपयांची बेनामी खाती असल्याचं समोर आलं होतं. कर्नाळा बॅंकेत गेल्या 8 वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बेनामी खातेदारकांच्या नावाने खाते उघडून यात कोट्यवधी रुपयांची कर्जरुपी रक्कम जमा करुन ती आपल्या मालकीच्या ट्रस्टमध्ये विवेक पाटील यांनी वळवल्याचं भाजप नेत्यांकडून पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं होतं.

किरीट सोमय्या, भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी यांनी पत्रकार परिषद घेत रिझर्व्ह बॅंकेने केलेल्या स्पेशल ऑडिटमध्ये विवेक पाटील दोषी असल्याचं सांगितलं होतं. विवेक पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या नावाने 63 बेनामी खाती उघडली. या खात्यांत 700 कोटी रुपयांवर रक्कम कर्जरुपी टाकण्यात आली. तेथून ती रक्कम विवेक पाटलांच्या मालकीचे असलेले कर्नाळा स्पोर्टस क्लब आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टमध्ये या वळती करून हडप करण्यात आली आहे, असा आरोपी भाजप नेत्यांनी केला होता.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भीमा कोरेगावमध्ये शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन
भीमा कोरेगावमध्ये शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन
BMC Election 2026: भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भीमा कोरेगावमध्ये शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन
भीमा कोरेगावमध्ये शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन
BMC Election 2026: भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
Embed widget