एक्स्प्लोर
Advertisement
मोदी जग फिरले, पण मराठवाड्यात आले नाहीत : कन्हैया कुमार
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण जग फिरले, पण मराठवाड्यात आले का? मराठवाड्यात असलेल्या तापमानात मोदी राहतील का? असा सवाल विचारत जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारनं नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
चेंबूर इथल्या टिळक नगरच्या आदर्श विद्यालयात आयोजित सभेदरम्यान बोलताना कन्हैय्या बोलत होता. सभेअगोदर कन्हैय्या कुमारने चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली.
काही लोकांना लालकिल्ल्यावर लाल झेंडा फडकवायचाय तर काहींना निळा पण भाजप देशावर भगवा झेंडा फडकवू इच्छेते ते कधीही शक्य होऊ देणार नाही, असंही कन्हैयांनी म्हणाला. केंद्रात संघाचं सरकार असल्याची टीकाही त्यानं केली.
कन्हैयाच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:
- आमचा कोणत्या एका जातीशी संबंध नाही, संपूर्ण जातीव्यवस्थेला विरोध आहे - कन्हैया कुमार
- आमचं राजकारण संघर्षापासून सुरु होऊन संघर्षापर्यंत संपतं - कन्हैया कुमार
- आपल्याला राजकीय पक्षांची नव्हे, जनआंदोलनाची गरज आहे - कन्हैया कुमार
- रोजगार उपलब्ध करा, अन्यथा जनता तुम्हाला पुन्हा संधी देणार नाही - कन्हैया कुमार
- विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केल्याने सत्ताधारी घाबरत आहेत - कन्हैया कुमार
- आता ओएलक्सचा जमाना आहे, लवकर काही तरी करा, अन्यथा लोक तुम्हाला हटवतील - कन्हैया कुमार
- या देशात लोकांना रोजगार नाही आणि मोदी बुलेट ट्रेनबाबत बोलतायेत - कन्हैया कुमार
- गरिबांच्या मुलांना शिक्षण मोफत द्या, कन्हैयाचं पंतप्रधान मोदींना आवाह
- शिक्षणावर होणारा खर्च हा 'खर्च' नसतो, गुंतवणूक असते - कन्हैया कुमार
- ही लढाई व्यापक होत चालली आहे - कन्हैया कुमार
- संसदेत विरोधक आहेत की नाही, हे माहित नाही, पण रस्त्यावर आपण विरोधक आहोत - कन्हैया कुमार
- नवउदारमतवादाचा जमाना असला, तरी त्याचा श्वास गुदमरतोय - कन्हैया कुमार
- मी 'कास्ट पॉलिटिक्स' नव्हे, 'सोशल जस्टिस पॉलिटिक्स' करतोय - कन्हैया कुमार
- मराठवाड्यात असलेल्या तापमानात मोदी राहतील का? - कन्हैया कुमार
- पंतप्रधान मोदी संपूर्ण जग फिरले, पण मराठवाड्यात आले का? - कन्हैया कुमार
- या देशात प्राण्यांनाही जातीयवादी बनवले जात आहे - कन्हैया कुमार
- मोदी सरकार नव्हे, केंद्र सरकार किंवा संघ सरकार म्हणा - कन्हैया कुमार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement