एक्स्प्लोर
Kangana vs Shiv Sena LIVE Updates : ऑफिसवर कारवाई केल्यानंतर कंगना रनौतकडून नवीन ट्विट
Kangana Ranaut vs Shiv Sena LIVE Updates : अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना यांच्यातील वाकयुद्ध काही थांबायचं नाव घेत नाही. आज कंगनाच्या ऑफिसवर कारवाई केल्यानंतर कंगनाकडून नवीन व्हिडीओ जारी करण्यात आली आहे.
LIVE
Background
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरसोबत केल्यानंतर तिच्याविरोधात सर्व स्तरांतून टिका केली जात असून तिचा वक्तव्याचा निषेधही व्यक्त करण्यात आला. परंतु, आता कंगनाने मुंबईचा थेट पाकिस्तान असा उल्लेख केला आहे. आज मुंबई महापालिकेने कंगनाच्या वांद्रे येथील कार्यालयावर कारवाई करण्यास सुरुवात केली. कार्यालयातील 12 अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. या कारवाईचे फोटो ट्वीट करत कंगनाने 'पाकिस्तान' असं कॅप्शन दिलं आहे. दरम्यान, कंगनाच्या कार्यालयावर केली जाणारी कारवाई मुंबई महानगरपालिकेकडून तूर्तास थांबवली आहे.
19:17 PM (IST) • 09 Sep 2020
कंगना रनौतच्या फ्लॅट समोरील पोलीस बंदोबस्त हटवला, सर्व पोलीस या परिसरातून निघून गेले
20:04 PM (IST) • 09 Sep 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक सुरु. कंगनाच्या ऑफिसवरील कारवाईच्या टायमिंगवर नाराज असल्याची चर्चा.
19:09 PM (IST) • 09 Sep 2020
19:08 PM (IST) • 09 Sep 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि करण जोहर गँग तुम्ही माझे काम करण्याचे ठिकाण तोडले आता माझे घर फोडा, मग माझा चेहरा आणि शरीर. पण, मी स्पष्टपणे सांगते की मी जगो किंवा मरो याची मी पर्वा करत नाही. मी व्यक्त होणारचं, असं ट्वीट कंगनाने केलंय.
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement