एक्स्प्लोर
कल्याणमध्ये महिला डॉक्टरची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या
प्राजक्ता कुलकर्णी यांनी आज सकाळी सहा ते सातच्या दरम्यान इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन त्यांनी उडी मारली.

कल्याण : कल्याणमध्ये एका महिला डॉक्टरने इमारतीवरुन उडी मारुन आमहत्या केली. खडकपाडा परिसरातील महावीर हाईट्स इमारतीत हा धक्कादायक प्रकार घडला. प्घरगुती वादातून महिला डॉक्टरनं हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
प्राजक्ता कुलकर्णी असं या मृत महिला डॉक्टरचं नाव असून त्यांचे पती प्रणव कुलकर्णी हेदेखील डॉक्टर आहेत. कल्याणच्या उच्चभ्रू खडकपाडा परिसरातील महावीर हाईट्स इमारतीत हे दाम्पत्य सासू-सासरे आणि दोन मुलांसह राहत होतं. आज सकाळी सातच्या सुमारास प्राजक्ता कुलकर्णी या त्यांच्या तिसऱ्या मजल्यावरील घरातून आठव्या मजल्यावर गेल्या आणि तिथून त्यांनी खाली उडी मारली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबतची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरु केला. हा प्रकार घरगुती वादातून घडला असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे कल्याणमध्ये खळबळ माजली असून इमारतीमधील कुणीही काहीही बोलायला तयार नाही.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
छत्रपती संभाजी नगर























