Kalyan Hoarding collapse: घाटकोपर दुर्घटनेनंतर आता कल्याणमध्ये होर्डिंग कोसळलं; अनेक वाहने दबली, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Kalyan Hoarding collapse: कल्याणमध्ये भलं मोठं होर्डिंग कोसळल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या होर्डिंगखाली अनेक वाहने दबले गेली आहेत.
कल्याण : अंगावर काटा आणणारी घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना ताजी असतानाच आता कल्याणमध्ये देखील होर्डिंग (Kalyan Hoarding collapse) कोसळण्याची घटना घडली समोर आली आहे. कल्याणमध्ये (Kalyan Hoarding collapse) भलं मोठं होर्डिंग कोसळल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या होर्डिंगखाली अनेक वाहने दबले गेली आहेत. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घटनास्थळी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. या दुर्घटनेनंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचं दिसून आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमध्ये (Kalyan Hoarding collapse) मोठं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. कल्याणमधील सहजानंद चौकात हे होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत २ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. होर्डिंग दुर्घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. मात्र, थेट वाहनांवर कोसळल्याने अनेक गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
होर्डिंग दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल
कल्याण पश्चिममधील (Kalyan Hoarding collapse) सहजानंद चौकात आज (शुक्रवारी) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास म्हणजे या वेळी या परिसरात मोठी रहदारी असते त्यावेळी ही घटना घडल्याची माहिती आहे. होर्डिंग कोसळल्याने वाहनचालकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या होर्डिंगजवळ रुग्णालयासहित अनेक दुकाने समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. वाहनांची पार्किंगही घटनास्थळी होती.
या घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. होर्डिंग कोसळल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिक आक्रमक झाले. अनेकदा या नागरिकांनी होर्डिंगविषयी तक्रार करूनही महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा नागरिकांनी केला आहे.