एक्स्प्लोर

राहुल कुलकर्णी यांना झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पत्रकार संघांचा प्रतिसाद

वांद्रे स्थानकाबाहेरील गर्दी प्रकरणावरुन एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांना अटक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध पत्रकार संघांनी आपापल्या भूमिका मांडल्या आहेत.

मुंबई : बांद्रा (वांद्रे) रेल्वे स्थानकाबाहेर मंगळवारी जमा झालेली गर्दी एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्या वार्तांकनामुळे झाल्याचा आरोप ठेवत त्यांना अटक करण्यात आली होती. वांद्रे सत्र न्यायालयाने राहुल कुलकर्णी यांचा जामीन मंजूर केला आहे. एबीपी माझा आणि मी राहुल कुलकर्णी अजूनही आमच्या बातमीवर ठाम असल्याची प्रतिक्रिया राहुल कुलकर्णी यांनी जामीनावर बाहेर आल्यानंतर दिली. दरम्यान, कालपासून अनेक पत्रकार संघटनांनी राहुल कुलकर्णी यांच्या अटकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत भूमिका मांडली.

कोरोनाव्हायरस आपण सगळेजण संयमाने सामना करत असताना पत्रकारांनीही संयमाने वागले पाहिजे अशीच टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनची भूमिका आहे. या काळामध्ये पत्रकारिता करताना कुठेच जनभावना उफाळून येतील, अशा प्रकारच्या बातम्या होऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत आणि वास्तववादी चित्र मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, राहुल कुलकर्णी यांना झालेली अटक याचे ही समर्थन करता येणार नाही. कारण पत्रकारांचे स्वातंत्र्य अबाधित असायला हवे. त्यांनी केलेले वार्तांकन हे रेल्वेच्या झालेल्या बैठका सुरू असलेले रिझर्वेशनचे बुकिंग आणि त्याच्या हाती आलेल्या कागदाच्या आधारे केले आहे. त्यामुळे अजामीनपात्र गुन्हा दाखल करून त्याला अटक करणे पत्रकारितेवर अन्याय करणारे आहे.

राहुल कुलकर्णी यांना झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पत्रकार संघांचा प्रतिसाद

अटक ते जामीन... राहुल कुलकर्णी यांच्याकडूनच ऐका घटनाक्रम

युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे आम्ही सरकारी यंत्रणांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण अशावेळी सरकारनेही आमचे विचार स्वतंत्र, व्यक्ती स्वातंत्र्य, माध्यम स्वातंत्र्यावर गदा आणू नये. ते अबाधित राहिले पाहिजे. बांद्रा येथे जी घटना घडली त्यामागचे खरे सूत्रधार कोण हे पोलिसांनी जरूर जनतेसमोर आणावेत. या कार्यात माध्यमांकडे जे जे साहित्य उपलब्ध आहे त्या सगळ्यासाठी आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत. मात्र, एकट्या राहुल कुलकर्णीला जबाबदार धरून अशा प्रकारचे केलेले कृत्य आम्हाला मान्य नाही, आम्ही सर्व राहुल कुलकर्णी यांच्या पाठीशी उभे आहोत. या अटकेचा निषेध करतो.

Bandra Incident | एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांना वांद्रे गर्दी प्रकरणी जामीन मंजूर

अटकेचा निषेध काही कारणास्तव एकटा बाहेर पडले तरी पोलीस कारवाई करतात मग इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण कशी काय झाली असा प्रश्न महाराष्ट्र पंत्रकार संघ मुंबईच्या वतीने विचारण्यात आला आहे. जर एबीपी माझाच्या बातमीमुळे गर्दी झाली असती तर ती राज्यभर व्हायला हवी होती. फक्त बांद्रा रेल्वे स्थानकाबाहेरचं का? राज्य पत्रकारसंघ या अटकेचा निषेध करत आहे. केंद्रीय माहिती प्रसारण केंद्राचे आदेश असतानाही राज्यभरात आठ पत्रकारांना पोलिसांकडून मारहाण झाली आहे. ऑल इंडिया रिपोर्टर्स असोसिएशन यांनी देखील या अटकेचा निषेध केला आहे. हा प्रकार पत्रकाराची गळचेपी करत असल्याची भूमिका त्यांनी मांडली. उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाने देखील या अटकेचा निषेध केला आहे.

#ISupportRahulKulkarni | बातमी, अटक आणि जामीन...राहुल कुलकर्णी यांच्याकडूनच ऐका संपूर्ण घटनाक्रम

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
Mumbai Hotel Food Prices : मुंबईत खाणं महागणार! हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढणार; 'आहार' संघटनेचा निर्णय
मुंबईत खाणं महागणार! हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढणार; 'आहार' संघटनेचा निर्णय

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
Embed widget