एक्स्प्लोर
Advertisement
गुन्ह्यांच्या शतकाजवळ पोहोचलेल्या सोनसाखळी चोराला बेड्या, 90 पेक्षा अधिक गुन्हे दाखल
मुंबईतील मालाड पोलिसांनी एका अशा चेन स्नॅचरला (सोनसाखळी चोर) अटक केली आहे, ज्याच्यावर मुंबईच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये चेन स्नॅचिंग, चोरी अशा प्रकारचे 90 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.
मुंबई : मुंबईतील मालाड पोलिसांनी एका अशा चेन स्नॅचरला (सोनसाखळी चोर) अटक केली आहे, ज्याच्यावर मुंबईच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये चेन स्नॅचिंग, चोरी अशा प्रकारचे 90 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. 100 गुन्ह्यांची नोंद होण्याआधीच त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा गुन्हेगार बडा आरोपी तसेच बडा साजीद नावाने प्रसिद्ध होता.
या चोराचे पूर्ण नाव साजीद अब्दुल अजीज शेख उर्फ बडा साजीद (30) असे आहे. साजीद हा वांद्रे पश्चिम येथे राहणारा आहे. तो पूर्णपणे गुन्हेगारी मानसिकतेच्या आहारी गेला आहे. जास्त पैसे कमावण्याच्या नादात साजीदने गुन्हेगारीचा मार्ग निवडला आणि आता तुरुंगात अडकला आहे.
27 मे रोजी मालाड येथील एक महिला आपल्या घरातून दागिने घालून निघाली होती. वाटेत तिला साजीद आणि त्याचा जोडीदार भेटले ज्यांनी त्या महिलेला सांगितले की, पुढे चोरी झाली आहे, तुम्ही तुमचे दागिने काढा. त्या महिलेने त्यांच्यावर विश्वास ठेवत आपले दागिने काढण्यास सुरवात केली. आपण त्या महिलेची मदत करत असल्याचे भासवून साजीद आणि त्याचा मित्र दागिने घेऊन पसार झाले.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत साजीदला अटक केली आहे. पोलीस सध्या साजीदच्या जोडीदाराचा शोध घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement