राज्यातील 14 पोलीस अधीक्षकांना प्रमोशन; मोक्षदा पाटील, पुण्याच्या पंकज देशमुखांनाही पदोन्नती
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना मुंबईच्या अपर पोलीस (Police) आयुक्त विशेष शाखा पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

मुंबई : राज्यातील 14 पोलीस अधीक्षकांना बदलीपर (Transfer) बढती देण्यात आली असून उप महानिरीक्षक पदावर त्यांची पदोन्नती करण्यात आली आहे. त्यानुसार, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांना अपर पोलीस आयुक्त मध्य प्रादेशिक विभाग मुंबई या ठिकाणी झाली नियुक्ती देण्यात आली आहे. तर, पुणे ग्रामीणच्या पंकज देशमुख यांना पुणे शहर अपल पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे. आयपीएस मोक्षदा पाटील (IPS) यांना राज्य राखीव पोलीस बल गटाच्या समादेशक पदावरुन पोलीस उपमहानिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना मुंबईच्या अपर पोलीस (Police) आयुक्त विशेष शाखा पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
"पोलीस उप महानिरीक्षक" श्रेणीत पदोन्नती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या "पोलीस अधीक्षक" श्रेणीतील "निवडसूची-2025" मध्ये समाविष्ट, पुढील तक्त्यातील स्तंभ (2) मध्ये नमूद भा.पो.से. अधिकारी यांची, स्तंभ (3) मध्ये निर्दिष्ट पदावरुन, स्तंभ (4) मध्ये नमूद पदावर पदोन्नतीने, महाराष्ट्र पोलीस अधिनियम (1951 चा 22) याच्या कलम 22 न मधील तरतुदींनुसार, याद्वारे, पदस्थापना करण्यात येत आहे, असे म्हणत आयपीएस अधिकाऱ्यंना पदोन्नती देण्यात आली आहे. शासनाचे सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीने ह्या पदोन्नती बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, यासंदर्भातील शासन आदेश, आस्थापना मंडळ क्र.1 च्या शिफारशींचा यथायोग्य विचार करुन व महाराष्ट्र पोलीस अधिनियम (1951 चा 22) याच्या कलम 22 न मध्ये नमूद सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात आला आहे.
राज्यातील 14 पोलीस अधीक्षकांना पोलीस उप महानिरीक्षक श्रेणीत पदोन्नती pic.twitter.com/ImkF0koRaq
— ABP माझा (@abpmajhatv) May 16, 2025
खालील 14 पोलीस अधीक्षकांना पदोन्नती
प्रसाद अक्कानवरु
पंकज देशमुख
अमोघ गावकर
जी. श्रीधर
मोक्षदा पाटील
राकेस कलासागर
प्रियंका नारनवरे
अरविंद साळवे
सुरेश कुमार मेंगडे
धनंजय कुलकर्णी
विजय मगर
राजेश बनसोडे
विक्रम देशमाने
राजेंद्र दाभाडे
वरील 14 आयपीएस अधिकारी व पोलीस अधीक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे.
हेही वाचा
पोलीस आयुक्तांचा दणका; गज्या मारणेच्या 2 फॉर्च्युनर, थार, नेक्सानसह 15 अलिशान गाड्या जप्त























