एक्स्प्लोर

कथित सर्वेनंतर भाजपच्या आमदार-खासदारांची धावाधाव

भाजपच्या कथित सर्वेची बातमी एबीपी माझाने प्रसिद्ध केल्यानंतर राज्यातील भाजपच्या आमदार आणि खासदारांमध्ये एकच खळबळ माजली आणि त्यांची धावाधाव सुरु झाली.

मुंबई : दिल्लीतील ‘चाणक्य’ या संस्थेकडून केलेल्या सर्वेत, भाजपचे राज्यातील 6 खासदार आणि जवळपास 50 आमदार धोक्यात असल्याचं समोर आलं आहे. ‘फ्री प्रेस जर्नल’ या दैनिकाने याबाबतचं वृत्त छापलं होतं. या सर्वेची बातमी एबीपी माझाने प्रसिद्ध केल्यानंतर राज्यातील भाजपच्या आमदार आणि खासदारांमध्ये एकच खळबळ माजली आणि त्यांची धावाधाव सुरु झाली. एबीपी माझाच्या बातमीनंतर धावाधाव संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, रावेरच्या खासदार रक्षा खडसे आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आपली कामगिरी ‘समाधानकारक’ असल्याचा दावा केला. त्यासाठी त्यांनी सर्वेची आकडेवारी असलेली कागदपत्र एबीपी माझाला दिली. विशेष म्हणजे, भाजपकडून गुप्त सर्वेबाबत काहीच माहिती दिली जात नव्हती. मात्र, लोकप्रतिनिधींनी आमच्याकडे दिलेल्या सर्वेच्या कागदपत्रांमुळे अशाप्रकारचा सर्वे झाल्याचेही उघड झाले. सर्वाधिक चर्चा एबीपी माझाच्या बातमीचीच झाली. या सर्वेत मतदारांना त्यांच्या मतदारसंघातील आमदार-खासदारांना रेटिंग/गुण देण्यास सांगितलं होतं. आमदार-खासदाराची कामगिरी समाधानकारक आहे की नाही?, आमदार-खासदारपदाचा उमेदवार बदलावा की कायम ठेवावा? असे प्रश्न या सर्वेत विचारण्यात आले होते. भाजपच्या गुप्त सर्वेत काय आहे? महाराष्ट्रात केलेल्या या सर्वेनुसार भाजपच्या 121 आमदारांपैकी 40 टक्के आमदारांची कामगिरी खूपच निराशाजनक आहे, असे फ्री प्रेसच्या बातमीत म्हटलंय. भाजपच्या एका आमदाराने दिलेल्या माहितीनुसार, या सर्वेत 40 टक्के आमदारांची चार वर्षातील कामगिरी अत्यंत वाईट असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. जर उर्वरीत कार्यकाळात कामगिरी सुधारली नाही तर 2019 मध्ये त्यांच्या जागी दुसऱ्या उमेदवाराला संधी दिली जाईल, असा इशारा देण्यात आल्याचं या फ्री प्रेसने बातमीत म्हटलं आहे.

जवळपास 60 टक्के मतदारांनी विद्यमान आमदार-खासदारांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं आहे. दुसरीकडे ज्या खासदारांना केवळ 19 टक्क्यांपर्यंत पसंती मिळाली आहे, त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. सध्याच्या भाजपच्या 21 खासदारांपैकी 6 खासदांचं तिकीट 2019 मध्ये कापण्याची चिन्हं आहेत, असेही फ्री प्रेसने बातमीत म्हटलंय.

माझी कामगिरी समाधानकारक, सुभाष भामरेंचा दावा भाजपने केलेल्या सर्व्हेमध्ये आपली कामगिरी समाधानकारक असल्याचा दावा धुळ्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी केला आहे. भामरे यांच्या मतदारसंघात केलेल्या सर्व्हेमध्ये 37 टक्के नागरिकांनी भामरे यांच्या कामगिरीवर 'संतुष्ट' असल्याचं मत नोंदवलं आहे. जनतेला दिलेली आश्वासनं पाळली, एकनाथ खडसेंचा दावा आमदार म्हणून माझी कामगिरी समाधानकारक असल्याचे सर्व्हेतून समोर आलंय, असा दावा माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलाय. तसेच, जनतेला दिलेली आश्वासनं पाळल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केलाय. ‘चाणक्य’च्या सर्व्हेतून जनतेला प्रश्न विचारण्यात आला की, “एकनाथ खडसे यांना पुन्हा आमदार बनवू इच्छित आहात का?” या प्रश्नाला 51 टक्के लोकांनी ‘होय’ असे उत्तर दिले, 41 टक्के लोकांनी ‘नाही’ असे उत्तर दिले, तर 8 टक्के लोकांनी ‘माहित नाही’ असे उत्तर दिले. माझी कामगिरी समाधानकारक : खासदार रक्षा खडसे भाजपने केलेल्या सर्व्हेमध्ये आपली कामगिरी समाधानकारक असल्याचा दावा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी केला आहे. रक्षा खडसे यांच्या मतदारसंघात केलेल्या सर्व्हेमध्ये 38 टक्के नागरिकांनी रक्षा खडसे यांच्या कामगिरीवर 'संतुष्ट' असल्याचं मत नोंदवलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
Sunil Kendrekar Majha Katta : माहिती नसलेलं FDA तुकाराममुळे समजलं, तो जे काम करतोय ते उत्कृष्ट, माजी सनदी अधिकारी सुनील केंद्रेकरांकडून 'माझा कट्टा'वर कौतुक
माहिती नसलेलं FDA तुकाराममुळे समजलं, तो जे काम करतोय ते उत्कृष्ट, माजी सनदी अधिकारी सुनील केंद्रेकरांकडून 'माझा कट्टा'वर कौतुक
Maharashtra Lavani : अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Embed widget