एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप मागे
राज्यभरातील 18 वैद्यकीय विद्यापीठातील 2300 प्रशिक्षणार्थी डॉक्टर या संपात सहभागी होते.
मुंबई : महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी संप अखेर मागे घेतला आहे. वेतनवाढीच्या मुद्द्यासाठी गेल्या सात दिवसांपासून प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप सुरु होता. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चेनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
वेतनवाढीच्या मुद्द्यावर आज प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर बैठक झाली. मागण्यांवर येत्या दोन महिन्यात तोडगा काढण्याचं आश्वासन सरकारने दिल्यानंतर संप मागे घेण्यात आला.
13 जूनपासून प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी वेतनवाढीच्या मुद्द्यावर संप पुकारला होता. आज संपाचा 7 वा दिवस होता.
राज्यभरातील 18 वैद्यकीय विद्यापीठातील 2300 प्रशिक्षणार्थी डॉक्टर या संपात सहभागी होते.
सर्व प्रशिक्षणार्थी डॉक्टर बुधवारी मध्यरात्रीपासून कामावर रुजू होणार आहे. राज्य सरकारने प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना दिलं जाणारं वेतन 6 हजार रुपयांवरुन 11 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याची आंदोलनकर्त्या डॉक्टरांची प्रमुख मागणी होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement