एक्स्प्लोर

देशाला सलग 30 वर्ष सेवा देणाऱ्या आयएनएस 'विराट'चा मुंबईहून गुजरातच्या दिशेनं अंतिम प्रवास

देशाला सलग 30 वर्ष सेवा देणाऱ्या आयएनएस 'विराट'नं शनिवारी मुंबई बंदरातून गुजरातमधील अलंग बंदराच्या दिशेनं आपला अंतिम प्रवास सुरू केला.

मुंबई : भारतीय नौदालामार्फत देशाला सलग 30 वर्ष सेवा देणाऱ्या आयएनएस 'विराट'नं शनिवारी मुंबई बंदरातून गुजरातमधील अलंग बंदराच्या दिशेनं आपला अंतिम प्रवास सुरू केला. रविवारी मध्यरात्रीपर्यंत विराट तिथं पोहचण्याची शक्यता आहे. त्यानंतर तिथं विराटला मोडीत काढण्याची प्रक्रिया सुरू होईल. साल 1987 ते 2017 अशी तीस वर्ष ही विश्वविक्रमी विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलातील सर्वात आघाडीची युद्धनौका म्हणून गणली गेली. सध्या हा मान आयएनएस विक्रमादित्यकडे आहे.

साल 1986 मध्ये ही युद्धनौका भारत सरकारनं सुमारे 65 कोटी डॉलर्सना इंग्लंडकडनं विकत घेतली होती. 1953 ते 1984 या काळात ही नौका ग्रेट ब्रिटनच्या रॉयल नेव्हीचा भाग होती. त्यावेळी तिचं नाव एचएमएस 'हर्मिस' असं होतं. त्यामुळे ही एक अशी युद्धनौका होती ज्यानं दोन देशांच्या नौदालासाठी काम केलेलं आहे. असा ऐतिहासिक वारसा लाभल्यानं या नौकेला 'गँड ओल्ड लेडी' या नावानं महासागरात एक विशेष ओळख प्राप्त होती. एका वेळी 2 हजारांहून अधिक सैनिकांचं वास्तव्य, फायटर विमानं, हेलिकॉप्टर्स आणि क्षेपणास्त्र वाहून नेण्याची विराटची क्षमता होती. 28 नॉटिकल म्हणजेच ताशी 52 किमी. वेगानं प्रवास करण्याची या युद्धनौकेची क्षमता होती. आयएनएस विराट ही जगातील सर्वात प्रदिर्घकाळ सेवेत विमानवाहू युद्धनौका म्हणून गिनिज बुकातही तिची नोंद आहे. भारत पाकिस्तान यांच्यातील 1971 चं युद्ध असो किंवा अरबी समुद्र आणि गल्फमधील युद्ध सराव आयएनएस विराटनं नेहमीचं भारताची शान कायम राखली. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी आपल्या कुटुंबियांसह काही जवळच्या मित्रमंडळीना आयएनएस विराटवरून लक्षद्वीप बेटांजवळ सहलीला घेऊन गेले होते. असा गौप्यस्फोट त्याकाळात एका नौदल अधिका-यानं केला होता.

साल 2017 मध्ये नौदलानं आयएनएस विराटला निवृत्त केल्याची घोषणा केली. त्यानंतर याचं संग्रहालय बनवण्याचा प्रस्तावही पुढे आला होता. मात्र, विक्रांतप्रमाणे विराटलाही मोडीत काढण्याचा निर्णय प्रशासनाकडनं घेण्यात आला. श्रीराम गुप्ता या कंपनीनं 38 कोटी 54 लाख रूपयांची बोली लावत ही नौका लिलावातून विकत घेतली. युद्धनौका असल्यानं तिचं धातूकाम हे अत्यंत उच्च दर्जाचं आहे. तसेच याचा बराचसा भाग हा बुलेटप्रूफ असल्यानं अनेकजण याचे अवशेष जमा करण्यास उत्सुक आहेत. विक्रांत प्रमाणे विराटच्या धातूसाठीही वाहननिर्मिती करणाऱ्या काही कंपन्या संपर्कात असल्याचं नव्या मालकांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे विक्रांतपासून बनवलेल्या एखाद्या मोटरसायकलप्रमाणे येत्या काळात विराटही एका नव्या रूपात चाहत्यांच्या भेटीसाठी येईल अशी अपेक्षा आहे.

महत्वाची बातमी : 

'मरिन ड्राईव्हवरील क्वीन नेकलेस तोडला, भराव टाकून जागाही खाणार', भाजपचा आरोप

Rafale In India | आयएनएस वॉरशिप डेल्टा सिक्स थ्री तुमचं भारतीय समुद्री सीमेत स्वागत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CNG Bike Launch : बजाज फ्रिडम 125 लवकरच बाजारात, सीएनजीची बाईकचा लूक पाहिलात का?ABP Majha Headlines : 11 PM : 05 Jully : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAnant Ambani& Radhika Merchant wedding | अनंत-राधिका मर्चेंटच्या संगीत सोहळ्याला दिग्गजांची उपस्थितीZERO HOUR With Sarita Kaushik | लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
Embed widget