एक्स्प्लोर

मुंबईत हुंड्यासाठी विवाहितेचा अमानुष छळ

घाटकोपरमध्ये विवाहितेचा हुंड्यासाठी सासरच्यांकडून अमानुषपणे छळ करण्यात आला.

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत दिवसेंदिवस महिला अत्याचाराची प्रकरणं समोर येत आहेत. विशेष म्हणजे अशा प्रकरणांमध्ये पोलिसांची भूमिका ही अतिशय निष्काळजीपणाची असल्याने संताप व्यक्त होत आहे. मुंबईतील घाटकोपरमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे. घाटकोपरमध्ये विवाहितेचा हुंड्यासाठी सासरच्यांकडून अमानुषपणे छळ करण्यात आला. आंबेडकर नगर भागात राहत असलेल्या पंचशिला मिलिंद सावंत या महिलेला हुंड्यासाठी सारच्यांनी अतोनात छळलं. या महिलेच्या हातावर, पायावर, पोटावर आणि गुप्तांगावर चटके देण्यात आले आहेत. त्याचबरोबर एक रिंगण आखून त्यात या महिलेला दिवसभर उभं राहण्याची शिक्षा देत सासरच्यांनी जबर मारहाण केली. मूळची लातूर जिल्ह्यातील असलेली पंचशीलाच्या वडिलांना अर्धांगवायू झाला आहे. तिची माहेरची परिस्थिती अतिशय बेताची आहे. मात्र सासरचे तिच्याकडे वारंवार 20 लाख रुपयांची मागणी करत होते आणि तिचा छळ करीत होते, असा आरोप तिने केला आहे. पोलिसांनी तक्रार घेण्यासाठी आठ तास बसवून ठेवलं या प्रकरणाची तक्रार करण्यास घाटकोपर पोलीस ठाण्यात गेलेल्या या महिलेला दुपारी तीन वाजल्यापासून बसवून ठेवण्यात आलं. त्यानंतर तिला दोन दिवसांनी या असं उत्तर देण्यात आलं. अखेर हे प्रकरण प्रसारमाध्यमांसमोर गेल्याचं कळताच रात्री 11 वाजता या महिलेचा जबाब नोंदवून सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे पोलिसांच्या या निष्काळजीपणाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. अखेर आठ तासानंतर महिलेच्या पतीसह पाच जणांवर कलम 498 अ अंतर्गत  गुन्हा नोंदवून पोलिसांनी या पीडित महिलेचा पती मिलिंद सावंत याला ताब्यात घेतलं. या मारहाण आणि शिक्षेमुळे जखमी झालेल्या पंचशिला यांच्यावर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान पंचशीला यांना तक्रार देण्यासाठी आठ तास बसवून ठेवणाऱ्या पोलिसांवर कारवाई होणार का, हा प्रश्न आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
Garam Masala Actress Nikita Rawal Viral Video: प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हादरवणारं कृत्य, सेल्फी घेताना चाहतीकडून बळजबरीनं किस, जबरदस्तीनं ओठ चघळले अन्... VIDEO
प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हादरवणारं कृत्य, सेल्फी घेताना चाहतीकडून बळजबरीनं किस, जबरदस्तीनं ओठ चघळले अन्... VIDEO
Embed widget