एक्स्प्लोर
शीना बोरा हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जीचं कोर्टात घुमजाव
पीटर मुखर्जीवर शीनाचं अपहरण आणि हत्या केल्याचा आरोप करणाऱ्या इंद्राणी मुखर्जीनं सत्र न्यायालयात घुमजाव केलं आहे.
मुंबई : पीटर मुखर्जीवर शीनाचं अपहरण आणि हत्या केल्याचा आरोप करणाऱ्या इंद्राणी मुखर्जीनं सत्र न्यायालयात घुमजाव केलं आहे. आपल्याला कुणावरही आरोप करायचे नाहीत अशी भूमिका आता इंद्राणीनं घेतली आहे.
काही दिवसांपूर्वी इंद्राणीनं कोर्टाला दिलेल्या एका अर्जात या गोष्टीचा उल्लेख करत आपला दुसरा पती पीटर मुखर्जीचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली होती. पीटरनंच त्याचा ड्रायव्हर श्यामवर रायच्या मदतीनं शीनाचं अपहरण करून तिची हत्या केल्याचा गौप्यस्फोट इंद्राणीनं या अर्जात केला होता. जर आरोप करायचे नसतील तर अर्ज मागे घ्या अथवा कोर्टानं हा अर्ज रद्द करावा अशी मागणी पीटरच्यावतीनं करताच आम्ही अर्ज मागे घेत नसल्याचं इंद्राणीच्या वकीलांनी कोर्टात स्पष्ट केलं.
यावर पीटर मुखर्जीच्यावतीनं कडवा विरोध करत इंद्राणीचा हा आरोप खोटा असल्याचं सांगितलं. तसेच इंद्राणी माध्यमांच्या मदतीनं कोर्टाची दिशाभूल करत असल्याचा आरोप करण्यात आला. जर इंद्राणीचा हा आरोप होता तर तिनं सुरुवातीलाच हे तपास अधिकाऱ्यांना का सांगितलं नाही? ही बाब पीटच्यावतीनं कोर्टात सांगण्यात आली.
शीना बोरा हत्या प्रकरणी तिची आई इंद्राणी मुखर्जी, इंद्राणीचा पहिला पती संजीव खन्ना, दुसरा पती पीटर मुखर्जी आणि ड्रायव्हर श्यामवर राय यांनी अटक केली आहे. श्यामवर राय हा या खटल्यात माफीचा साक्षीदार बनला असून त्याची साक्ष नोंदवण्याचं काम सध्या सुरु आहे.
काय आहे प्रकरण?
24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची गळा आवळून हत्या केल्याची कबुली इंद्राणीच्या ड्रायव्हरने दिली होती. गाडीमध्ये गळा आवळून शीनाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पेट्रोल टाकून तिचा मृतदेह रायगडजवळ जाळण्यात आला. शीनाची हत्या झाली, त्यावेळी इंद्राणी गाडीत असल्याची माहितीही ड्रायव्हरने दिली. शीनाचा मृतदेह 23 मे 2012 रोजी रायगडजवळ आढळून आला होता.
हत्येप्रकरणी आधी शीना आई इंद्राणीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना याला कोलकातामधून अटक झाली होती
अपहरण आणि कारमध्येच हत्या
वांद्र्याच्या नॅशनल कॉलेजबाहेरुन शीना बोराचं अपहरण करुन कारमध्येच गळा आवळून तिची हत्या केली. वाद मिटवण्यासाठी इंद्राणीने शीनाला मेसेज करुन वांद्र्याला बोलावलं होता, असं म्हटलं जातं.
पतीची फसवणूक
इंद्राणी मुखर्जीने पती पीटर मुखर्जी यांनाही अंधार ठेवल्याचं उघड झालं. पहिलं लग्न लपवण्यासाठी, स्वत:च्या मुलीला बहिण सांगून, इंद्राणीने पती पीटर यांना अंधारात ठेवलं होतं.
इंद्राणीची मुलगी आणि पीटर मुखर्जींच्या मुलाचं प्रेमप्रकरण
या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, इंद्राणीची मुलगी शीना आणि पीटर मुखर्जींच्या मुलाचं प्रेमप्रकरण होतं. म्हणजे इंद्राणी आणि पीटर या पती-पत्नींच्या मुलांचे आपापसात प्रेमसंबंध होते.
त्या माय-लेकीच
शीनाचा भाऊ मिखाईल बोरानेही शीना आणि इंद्राणी या माय-लेकीच असल्याचा दावा केला होता.
संबंधित बातम्या :
बड्या लोकांच्या दबावामुळे शीना बोरा हत्येचा तपास 3 वर्षे रखडला: मारिया
शीना बोरा हत्या : सर्व आरोपींवर हत्येचा आरोप निश्चित
शीना बोरा हत्या : इंद्राणीचे पती पीटर मुखर्जी यांना अटक
शीना बोरा हत्याकांड प्रकरण : गुप्त साक्षीदाराचा जबाब पीटर मुखर्जींकडे सोपवणार
शीना बोरा हत्या प्रकरणातील इंद्राणी आता 'अशी' दिसते
शीना बोरा हत्याकांड: इंद्राणीच्या ड्रायव्हरची माफीचा साक्षीदार होण्याची इच्छा
शीना बोरा हत्या: पीटर मुखर्जींवर हत्येचा गुन्हा
शीना बोरा हत्या प्रकरणातील इंद्राणी आता ‘अशी’ दिसते
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement