Indian Railways : उन्हाळी सुट्टी गावी जाणाऱ्यांसाठी खुशखबर ! 28 अतिरिक्त विशेष ट्रेन; येथे करा आरक्षण
Summer Special Train : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : उन्हाळी सुट्ट्यामध्ये (Summer Holidays) प्रवाशांचा वाढता ओघ लक्षात घेता मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेकडून मुंबई - मऊ / कोच्चुवेली दरम्यान 28 अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन सेवा (Summer Special Train) चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
अतिरिक्त उन्हाळी रेल्वे गाड्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मऊ विशेष (4 फेर्या)
01079 विशेष गाडी बुधवारी दि. 10.04.2024 आणि दि. 01.05.2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 22.35 वाजता सुटेल आणि मऊ येथे तिसऱ्या दिवशी 11.10 वाजता पोहोचेल. (2 फेर्या)
01080 विशेष गाडी शुक्रवार दि. 12.04.2024 आणि दि. 03.05.2024 रोजी मऊ येथून 13.10 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी 00.40 वाजता पोहोचेल. (2 फेर्या)
थांबे : दादर, ठाणे कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, विरांगना लक्ष्मीबाई झांसी, उरई, गोविन्दपुरी, फतेहपुर, प्रयागराज, जंघई, जौनपूर, शाहगंज आणि आजमगड.
ट्रेनचे डब्बे : 2 वातानुकूलित - तृतीय, 18 शयनयान आणि 2 लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन. (22 डब्बे)
लोकमान्य टिळक टर्मिनस-कोच्चुवेली साप्ताहिक विशेष (24 फेर्या)
01463 साप्ताहिक विशेष दि. 11.04.2024 ते दि. 27.06.2024 पर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई 16.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 20.45 वाजता कोचुवेली येथे पोहोचेल.
01464 साप्ताहिक विशेष कोचुवेली दि. 13.04.2024 ते दि. 29.06.2024 पर्यंत दर शनिवारी 16.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 21.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन, कारवार, कुमटा, कुंदापुरा, उडुपी, मंगळुरु जंक्शन, कासरगोड, कण्णूर, कोषिक्कोड, तिरूर, षोरणूर, त्रिसूर, एरणाकुलम जं, कोट्टानम तिरुवल्ला, चेंगन्नूर, कायमकुलम आणि कोल्लम जं.
ट्रेनचे डब्बे : 1 प्रथम वातानुकूलित, 1 प्रथम वातानुकूलित कम वातानुकूलित द्वितीय, 2 वातानुकूलित-द्वितीय, 6 वातानुकूलित-तृतीय, 2 गार्ड्स ब्रेक व्हॅनसह 8 जनरल सेकंड क्लास डबे.
अतिरिक्त उन्हाळी गाड्यांसाठी येथे करा आरक्षण
उन्हाळी विशेष ट्रेन 01079 आणि 01463 साठी विशेष शुल्कावर बुकिंग 8 मे 2024 रोजी सर्व आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल. विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
महत्त्वाच्या इतर बातम्या :