Railway Recruitment 2024 : रेल्वेमध्ये 700 हून अधिक जागांसाठी बंपर भरती; 10 वी पास आणि फक्त 'ही' पात्रता असल्यास आत्ताच करा अर्ज
Railway Recruitment 2024 : दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 एप्रिल 2024 आहे.
Railway Recruitment 2024 : रेल्वेमध्ये (Indian Railway) नोकरी (Job) करू इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी, तरूणांसाठी आणि उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेमध्ये शिकाऊ पदांसाठी (ॲप्रेंटिसशिप) 700 हून अधिक रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, बिलासपूर विभागात प्रशिक्षणार्थी भरती केली जाईल. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 एप्रिल 2024 आहे. अधिसूचनेनुसार, ॲप्रेंटिसशिप ॲक्ट 1961 आणि अप्रेंटिसशिप नियम 1962 अंतर्गत दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागात एक वर्षासाठी प्रशिक्षणार्थी भरती सुरु होणार आहे.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेमध्ये शिकाऊ उमेदवारीसाठी जर उमेदवारांना अर्ज करायचा असेल तर, नॅशनल ॲप्रेंटिसशिप पोर्टलला भेट द्यावी लागेल. शिकाऊ उमेदवारीसाठी कोणत्या ट्रेडमध्ये रिक्त जागा आहेत ते जाणून घेऊयात.
पदाचे नाव
सुतार -38
कप -100
ड्राफ्ट्समन (सिव्हिल) -10
इलेक्ट्रिशियन -137
इलेक्ट्रिशियन (यांत्रिक) - 05
फिटर - 187
मशीनिस्ट - 04
चित्रकार - 42
प्लंबर - 25
मेकॅनिक (रेफ्रिजरेटर) - 15
SMW - 04
स्टेनो इंग्रजी - 27
स्टेनो हिंदी -19
डिझेल मेकॅनिक -12
टर्नर - 04
वेल्डर -18
वायरमन - 80
रासायनिक प्रयोगशाळा सहाय्यक - 04
डिजिटल छायाचित्रकार - 02
शिकाऊ उमेदवारीसाठी पात्रता काय असणार?
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेमध्ये शिकाऊ उमेदवारांसाठी, संबंधित ट्रेडमध्ये ITI सह 10वी/12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा नेमकी किती असावी?
वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, उमेदवारांचं वय किमान 15 वर्षे आणि कमाल 24 वर्षे असणं गरजेचं आहे. तर, SC/ST वर्गातील उमेदवारांना कमाल वयात 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे आणि माजी सैनिक आणि अपंगांना 10 वर्षांची सूट मिळेल.
शिकाऊ उमेदवारीसाठी निवड प्रक्रिया कशी असेल?
उमेदवारांची निवड 10वी आणि ITI गुणांच्या आधारे शिकाऊ उमेदवारीसाठी केली जाईल. दोघांच्या गुणांना समान वेटेज मिळेल. उमेदवार किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असावा.