एक्स्प्लोर

‘मोपलवारांसोबतची ‘ती’ ऑडिओ क्लीप खरी, तो आवाज माझाच’

'मोपलवारांची ती ऑडिओ क्लीप खरी आहे. मोपलवारांशी मीच बोलत होतो. त्यामधील आवाजही माझाच आहे.'

मुंबई : एबीपी माझाच्या बातमीनंतर वरिष्ठ सनदी अधिकारी आणि समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना चौकशीपर्यंत पदच्युत करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही माहिती दिली. दरम्यान, मोपलवारांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधील मोपलवारांशी मध्यस्थी करणाऱ्या सतीश मांगलेनं याबाबत धक्कादायक माहिती दिली. एबीपी माझाशी बोलताना मांगलेनं स्पष्ट केलं की, ‘त्या ऑडिओ क्लीपमधील आवाज माझाच आहे.’ मोपलवारांची 'ती' ऑडिओ क्लीप खरी आहे : सतीश मांगले ‘मोपलवारांची ती ऑडिओ क्लीप खरी आहे. मोपलवारांशी मीच बोलत होतो. त्यामधील आवाजही माझाच आहे. या प्रकरणात मी माफीचा साक्षीदार होण्यास तयार आहे. ऑडिओ क्लीपसंबंधीची सगळी माहिती माझ्याकडे आहे. मी किंवा इतर कुणीही जर ब्लॅकमेल करत असेल तर मोपलवारांनी याबाबत आतापर्यंत तक्रार का दिली नाही?, दरम्यान, याआधी एकदा माझं अपहरणही करण्यात आलं होतं. त्यामुळे माझ्या जीवाला सध्या धोका आहे. म्हणून मला पोलीस संरक्षण देण्यात यावं.' असं मांगलेनं सांगितलं. या प्रकरणातील मी सीडी सीएमओ आणि पीएमओपर्यंत दिली आहे. त्यातील काही भाग कुणीतरी व्हायरल केला. माझ्यासारखे मोपलवारांकडे कामं घेऊन येणारे अनेकजण आहेत. ते काही कामं घेऊन येतात बिल्डरांची. नियमबाह्य कामांची फाईल मी मोपलवारांकडे घेऊन जायचो. त्यानंतर ते पुढे कुणाशी बोलायचे ते मला माहित नाही. पण त्यानंतर संबंधित फाईल क्लीअर करण्यासाठी किती पैसे ते सांगायचे.' अशी धक्कादायक माहिती मध्यस्थी सतीश मांगलेनं दिली आहे. ‘मोपलवारांसोबतची ‘ती’ ऑडिओ क्लीप खरी, तो आवाज माझाच’ दरम्यान, मोपलवारांना चौकशीपर्यंत पदच्युत करण्यात आलं असलं तरी त्यांना निलंबित करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. मोपलवार हे समृद्धी महामार्गाचे प्रमुख तसंच एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आहेत. दोनच दिवसांपूर्वी बोरीवलीच्या भूखंडासाठी कोट्यवधी रुपयाची लाच द्यावी लागणार असल्याचं ते एका मध्यस्थाला सांगत होते, हे संभाषण एबीपी माझाच्या हाती लागलं, त्यानंतर दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. मोपलवार यांच्या निलंबनाची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. काय आहे नेमकं प्रकरण? सुरुवातीपासून वादग्रस्त ठरलेला समृद्धी महामार्ग प्रकल्प आता एका नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचे वादग्रस्त फोन संभाषणं समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाले आहेत. या ऑडिओ क्लीपची सत्यता एबीपी माझाने तपासलेली नाही. ज्या समृद्धी महामार्गावरून सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये रण सुरु आहे, त्याच महामार्गाची जबाबदारी असलेल्या एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि संस्थापकीय संचालक मोपलवार यांच्यावर एक गंभीर आरोप झाला आहे. धक्कादायक म्हणजे हा आरोप सेटलमेंटचा आहे. शेतकऱ्यांच्या मते या ऑडिओ क्लिपमध्ये मोपलवार आणि एक मध्यस्थ यांच्यात एका इमारतीच्या बांधकामावरून सेटलमेंट सुरु आहे. त्याऑडिओ क्लिपमध्ये काय आहे?
मोपलवार  जाल मेहता नाव सांगितलं ना तुम्ही? मध्यस्थी – हो.. जाल मेहता. मोपलवार – त्याला सांगा आपण त्याला 15 हजार स्क्वेअर फुटचा प्लॉट देतोय. मध्यस्थी – कुठे? मोपलवार – अरे तो बोरीवलीचा.. त्याला मंत्रालयात काही द्यावे लागतील.. आपल्याकडे..त्याला कोट करा 1 कोटी रुपये.. मध्यस्थी – अच्छा मोपलवार – त्याला आपण दिलेल्या प्लॉटमुळे हजार स्क्वेअर फुटचे 50 फ्लॅट विकायला मिळतील… मंत्रालयात 1 – 2 दिले तर ती जमीन मिळून जाईल. मध्यस्थी – म्हणजे टोटल मंत्रालय पकडून त्याला 4 करोडचा खर्च आहे.. मोपलवार – एक दोन पकडून काय असेल ते असेल… आपल्याकडे एकच्या खाली घेणार नाही.. नाहीतर सोडून द्या विषय. कुठल्याच फ्रेममध्ये बसत नाही ते मध्यस्थी – नियमबाह्य आहे म्हणून एवढं करावंच लागेल मोपलवार  1500 मीटर, त्यात स्लम असल्यामुळे 2.5 चा एफएसआय मिळेल. एकूण त्याला 50 हजार स्क्वेअर फिटचे फ्लॅट सेल करायला मिळतील. 10 हजार पर स्क्वेअर फिट जरी म्हटलं तरी 50 कोटी रुपयांचे फ्लॅट होतील. त्यात 30 – 40 कोटी खर्च म्हटला तरी 10 कोटी त्याचा फायदा आहे. मध्यस्थी – त्याला वाढवून सांगू की आहे तसच? मोपलवार  सांगा तुम्ही… आधी काय म्हणतोय बघू.. मोपलवार – अशोक सखाराम उबाळे या हिरोचा फोन आला..त्याला नाही म्हणून सांग.. मध्यस्थी – काय म्हणून? मोपलवार – कुठल्या तरी मंडल अधिकाऱ्याची वसई जिल्ह्यातून ठाणे जिल्ह्यात बदली करायला. या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात बदली जमत नाही… नाही म्हणून सांग त्याला..बाकी त्याला सांगून टाक.
  mopalwar-580x395 या संभाषणात मोपलवार आहेत की नाहीत, याची पुष्टी आम्ही करत नाही… पण समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सध्या या आणि अशा अनेक ऑडिओ क्लिप्सची जोरदार चर्चा आहे. मोपलवारांची कारकीर्द वादग्रस्त कारकीर्द असलेल्या मोपलवारांना आघाडी सरकारच्या काळापासून  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कोकण विभागीय आयुक्त अशा प्लम पोस्टिंग मिळाल्या आहेत. भाजप सरकार आल्यानंतरही त्यांना मर्जीची खाती मिळाली. मोपलवारांचं स्पष्टीकरण ”माझ्यावर केलेले आरोप हे मला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. समृद्धीची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे माझ्यावर आरोप होत आहेत. काही लोक माझ्या खाजगी आयुष्याला लक्ष करून मला ब्लॅकमेल करत आहेत. यापूर्वीच्या प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे आणि चौकशीअंती तथ्य समोर येईल.” असं स्पष्टीकरण मोपलवार यांनी दिलं. VIDEO : संबंधित बातम्या : एबीपी माझाचा गौप्यस्फोट, महामार्गात दलालांची 'समृद्धी'?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget