युती झाली तरच आगामी निवडणुकीत फायदा, भाजपचा सर्व्हे
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झाली तरच युतीचे खासदार मोठ्या प्रमाणातून केंद्रात जातील. युती झाली नाही तर मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीला बळ मिळेल. यासंदर्भात भाजपनं एक अंतर्गत सर्व्हे केला आहे, यामध्ये ही बाब पुढे आली आहे.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली तरच दोन्ही पक्षांना फायदा होईल, अशी माहिती भाजपच्या अंतर्गत सर्व्हेतून समोर आली आहे. युती न झाल्याचा त्याचा थेट फायदा आघाडीला होणार असल्याचंही या सर्व्हेतून समोर आलं आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यास युतीचे खासदार मोठ्या प्रमाणातून केंद्रात जातील. युती झाली नाही तर मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीला बळ मिळेल. यासंदर्भात भाजपनं एक अंतर्गत सर्व्हे केला आहे, यामध्ये ही बाब पुढे आली आहे.
लोकसभा निवडणूक युतीने एकत्र लढल्यास 30 ते 34 जागा जिंकण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 18 ते 20 जागा मिळू शकतात. स्वबळावर लढल्यास भाजपला केवळ 15 ते 18 जागांवर तर शिवसेनेला 8 ते 10 जागांवर समाधान मानावं लागेल. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 22 ते 28 जागा मिळू शकतात, अशी माहिती भाजपच्या सर्व्हेतून समोर आली आहे.
शिवसेना आणि भाजपची युती होणार की नाही होणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनसोबत युती करण्यास इच्छूक असल्याचं अनेक भाजप नेत्यांनी बोलून दाखवलं आहे. मात्र नाराज शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका वेळोवेळी जाहीर केली आहे.