एक्स्प्लोर

पुन्हा ट्रान्सफर... IAS जी श्रीकांत यांची 15 दिवसांत दुसरी बदली; राज्यातील 4 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

जी.श्रीकांत हे 2009 च्या युपीएससी बॅचचे आयएएस अधिकारी असून गेल्या 15 दिवसांपूर्वी ते छत्रपती संभाजीनगर मनपाचे आयुक्त होते.

मुंबई : राज्यातील आयएसएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा (Transfer) धडका सुरुच असून कालच 5 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर, आज पुन्हा एकदा चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या चार अधिकाऱ्यांमध्ये जी. श्रीकांत (Shrikant) यांचाही समावेश आहे. जी श्रीकांत हे सध्या नवी मुंबई जल जीवन मिशन अभियानाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. मात्र, आता त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, 3 एप्रिल रोजीच त्यांची जल जीवन मिशन नवी मुंबई येथे मिशन संचालक पदावर बदली करण्यात आली होती. त्यामुळे, गेल्या 15 दिवसांत ही त्यांची दुसरी बदली आहे. 

जी.श्रीकांत हे 2009 च्या युपीएससी बॅचचे आयएएस अधिकारी असून गेल्या 15 दिवसांपूर्वी ते छत्रपती संभाजीनगर मनपाचे आयुक्त होते. मात्र, 3 एप्रिल रोजी अभियान संचालक, जल जीवन मिशन, नवी मुंबई येथे त्यांची बदली करण्यात आली होती, ते तिथे कार्यरतही होते. आता, त्यांची विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर विभाग, येथे नियुक्ती करण्यात आली. तर, जितेंद्र पापळकर विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर विभाग यांची GST, मुंबई सह आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पापळकर हे 2010 च्या युपीएससी बॅचचे IAS अधिकारी आहेत. 

जी. श्रीकांत यांच्याजागी गंगाथरण डी. यांची मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, नवी मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गंगाथरण हे 2013 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यासह, जगदीश मिनियार मुख्य प्रशासक (नवीन टाउनशिप), सिडको, छत्रपती संभाजी नगर यांची महिला व बालक आयुक्त पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मिनियार हे 2015 च्या बॅचचे युपीएससी उत्तीर्ण अधिकारी आहेत. 

दरम्यान, कालच पाच अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले होते, त्यानंतर आज आणखी चार अधिकाऱ्यांची बदली करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. 

काल 15 एप्रिल रोजी बदली केलेले अधिकारी

डॉ. बी. एन. पाटील (आयएएस: नॉन-एससीएस: 2014), संचालक, पर्यटन, मुंबई यांची प्रकल्प संचालक, रुसा, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मुंबई येथे बदली झाली आहे. मंगेश जोशी (आयएएस: एससीएस: 2015), उपमहासंचालक, यशदा, पुणे यांची संचालक, पर्यटन, मुंबई येथे बदली झाली आहे. यासह, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम (आयएएस: आरआर: 2020), यांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी येथे बदली करण्यात आली आहे. कुशल जैन (आयएएस: आरआर: 2022), प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, अहेरी आणि सहायक जिल्हाधिकारी, अहेरी उपविभाग, गडचिरोली यांची मुख्य सोलापूर जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. तर, रेवैया डोंगरे (IAS:RR:2023) सहायक जिल्हाधिकारी, भूम उपविभाग, धाराशिव यांना यवतमाळ येथे प्रकल्प अधिकारी, ITDP, पांढरकवडा आणि सहायक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. 

हेही वाचा

ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
Ganesh Festival 2026 MSRTC : गौरी-गणपतीसाठी एसटी महामंडळाचा मेगाप्लॅन, कोकणात एसटीच्या 5,220 जादा बसेस धावणार, प्रताप सरनाईक यांची माहिती
गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या 5220 जादा बसेस धावणार, प्रताप सरनाईक यांची माहिती
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
बेस्टच्या स्थापना दिनीच बसचा अपघात, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, मुलुंडमधील चेक नाका परिसरात घडली घटना
बेस्टच्या स्थापना दिनीच बसचा अपघात, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, मुलुंडमधील चेक नाका परिसरात घडली घटना

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget